Rajni Sanjay Savkare : रजनी संजय सावकारे यांच्याकडून नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल, भाजपकडून उमेदवारीची दाट शक्यता!

---Advertisement---

 


Rajni Sanjay Savkare : भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी विद्यमान आमदार आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी संजय सावकारे यांनी आज दुपारी उपविभागीय अधिकारी कार्यालय, भुसावळ येथे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपल्या उमेदवारीचे नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे.

उत्तर महाराष्ट्रातील एकमेव ‘अ’ वर्ग नगरपरिषद असलेल्या भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी यावेळी अनुसूचित जाती महिला राखीव प्रवर्गातून आरक्षित जागा जाहीर करण्यात आली होती.

सुरुवातीपासूनच सर्वात प्रमुख दावेदार म्हणून विद्यमान आमदार आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या सौभाग्यवती असलेल्या आणि प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून भुसावळ शहरासह तालुक्यात महिलांच्या हितासाठी विविध प्रकारचे सामाजिक क्षेत्रातील उपक्रम राबविणाऱ्या सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या अशी ओळख असलेल्या रजनी संजय सावकारे यांनी आज दुपारी उपविभागीय अधिकारी कार्यालय ,भुसावळ येथे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपल्या उमेदवारीचे नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे. यावेळी मोजक्या महिला कार्यकर्त्या उमेदवारी अर्ज दाखल होत असताना कार्यालयाच्या बाहेर उपस्थित असल्याचे दिसून आले.

दरम्यान , नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या वेळी त्यांनी गळ्यात भारतीय जनता पक्षाचा गमछा घातलेला होता. यामुळे भुसावळ शहरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आता उत्सवाचे वातावरण निर्माण झालेले असून, भारतीय जनता पक्षाकडून एबी फॉर्म मिळण्याची दाट शक्यता असल्याच्या कारणावरून नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करणार्‍या सौ रजनी संजय सावकारे या एकमेव उमेदवार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी अनेकांनी दावेदारी करून ,विविध चर्चांना उधाण आणले होते. आता त्यांच्या विरोधात कोणकोणत्या राष्ट्रीय पक्षांकडून उमेदवार उभे केले जातात, याकडे भुसावळ शहरातील नागरिकांचे लक्ष केंद्रित झालेले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---