एसडी-सीडतर्फे २१ नोव्हेंबर रोजी शिष्यवृत्ती वितरण

---Advertisement---

 


जळगाव : सिने अभिनेते एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या हस्ते एसडी-सीड शिष्यवृत्ती वितरण २१ नोव्हेंबर २०२४, शुक्रवार रोजी संध्याकाळी ०५ वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्य गृह, जळगाव येथे होणार आहे. यावेळी चित्रपट सृष्टीतील पिळगावकर दाम्पत्याची प्रेरणादायी प्रकट मुलाखत प्रसिद्ध अभिनेत्या दीप्ती भागवत घेणार आहे.

सचिन पिळगावकर यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहेत, ज्यांनी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. बालकलाकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात करून, त्यांनी “महागुरु” म्हणून ओळख मिळवली आहे, कारण ते अनेक भूमिकांमध्ये यशस्वी ठरले आहेत आणि सतत नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांची मराठी मातृभाषा असतानाही, ते उर्दूच्या मधुरतेत विचार करतात आपल्या अमोघ वत्कृत्वातून उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी प्रेरणादायी, अद्भूत आणि करिअरला नवीन दिशा देण्याचा जीवन प्रवासाचा पट त्यांच्या मुलाखती मधून उलगडणार आहे. हे मार्गदर्शन मुले व तरुणांसोबतच मोठी स्वप्ने पाहणाऱ्या सर्वांसाठीच अतिशय मोलाचे ठरणार आहे.

विदयार्थांना यशाचा महामंत्र देणाऱ्या ह्या कार्यकमाला सर्वांनी उपस्थित रहावे. त्यांचा जीवन प्रवास व करिअरला दिशादर्शक असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

तरी शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थी, पालक, शिक्षक व प्राध्यापक, विद्यार्थी चळवळीशी संबंधित शिक्षणप्रेमींनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन एसडी-सीड अध्यक्षा सौ. रत्नाभाभी जैन, कार्याध्यक्षा श्रीमती मीनाक्षी जैन, गव्हर्निग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---