---Advertisement---
राज्यभारत नगर पंचायत नगर आणि परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढल्या जाणार असल्यामुळे पक्षांतराला वेग आल्याचं पहायला मिळत आहे, इच्छूक उमेदवार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत.
अशातच मालेगावामध्ये मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वेळी मालेगाव विधानसभा निवडणूक लढवलेले बंडूकाका बच्छाव हे भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. बंडू काका बच्छाव यांनी नुकतीच भाजप कार्यालयाला भेट दिल्यामुळे लवकरच ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
बंडूकाका बच्छाव यांनी भाजपात प्रवेश केला तर हा शिंदेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का असणार आहे. कारण बंडू काका आणि मंत्री दादा भूसे हे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी मानले जातात. जर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती झाली नाही तर बंडू काका बच्छाव यांच्या रुपाने शिंदे गटापुढे मोठं आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या मतदारसंघात युती न झाल्यास आता शिवसेनेचं टेन्शन वाढण्याची शक्यात आहे. प्रसाद हिरेनंतर, डॉ.तुषार शेवाळेंनंतर बंडू काका बच्छाव यांनीही भाजपात प्रवेश केला तर या मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार आहे.









