---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात थंडीची लाट तीव्र झाली असून, जळगाव शहराचे तापमान या हंगामातील सर्वात कमी ८ अंश सेल्सिअस इतके खाली घसरले आहे. अशात आगामी तीन दिवस थंडीची ही लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
रविवार, १६ नोव्हेंबर रोजी पहाटे तापमान ८ अंशांवर असताना, १५ ते २० किमी वेगाने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे शहरात गारठा अधिकच वाढलेला जाणवत होता. दरम्यान, कोरड्या हवामानामुळे ही थंडीची तीव्रता वाढली असून, नागरिकांना ऊब घेण्यासाठी शेकोट्यांचा आधार घ्यावा लागत आहे.
जळगाव शहराचे तापमान या हंगामातील सर्वात कमी ८ अंश सेल्सिअस इतके खाली घसरले आहे. अशात आगामी तीन दिवस थंडीची ही लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात २० ते २५ नोव्हेंबरपर्यंत थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे जळगावकरांना महिनाभर तरी थंडीचा सामना करावा लागणार आहे.