---Advertisement---
IND A vs BAN A : कतारमधील दोहा येथे आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ स्पर्धेचे उपांत्य सामने आज, शुक्रवारी खेळवले जात आहे. बांगलादेशने १६५ धावांचे दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना, भारताने ५३ धावांवर पहिला विकेट गमावला आहे. वैभव सूर्यवंशी बाद झाला असून, भारताला पहिला धक्का बसला आहे.
जितेश शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला स्पर्धेत आतापर्यंत फक्त एकच पराभव पत्करावा लागला आहे. आता टीम इंडियाकडे ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. हे साध्य करण्यासाठी आता इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
भारत अ संघाने दोहा येथे झालेल्या स्पर्धेत शानदार सुरुवात केली आणि पहिल्याच सामन्यात युएईचा १४८ धावांनी पराभव केला. त्या विजयाचा स्टार होता १४ वर्षीय स्फोटक सलामीवीर वैभव सूर्यवंशी, ज्याने फक्त ४२ चेंडूत १४४ धावांची आश्चर्यकारक खेळी केली. कर्णधार जितेश शर्मानेही ८३ धावा केल्या.
तथापि, दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला पाकिस्तानकडून ८ विकेटने पराभव पत्करावा लागला. त्या सामन्यात वैभवनेही जोरदार फलंदाजी केली, त्याने ४७ धावा केल्या, परंतु त्याच्या आणि नमन धीर (३५) व्यतिरिक्त, इतर फलंदाज अपयशी ठरले. त्यानंतर इंडिया अ संघाने ओमानला पराभूत करून सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले.









