कामगार क्षेत्रात क्रांतिकारी सुधारणा, चार नवे कायदे लागू

---Advertisement---

 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शुक्रवारी ऐतिहासिक निर्णय घेत चार क्रांतिकारी कामगार कायदे देशात लागू केले. हे चार कायदे आजपासून अधिसूचित करण्यात आले, असे केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले. केंद्र सरकारने आज अधिसूचना जारी केल्यामुळे वेतन संहिता-२०१९, औद्योगिक संबंध संहिता-२०२०, सामाजिक सुरक्षा संहिता-२०२० आणि व्यावसायिक सुरक्षा, स्वास्थ्य आणि कार्यपालन संहिता २०२० या नव्या कायद्याच्या जागेवर चार सुधारित कायदे देशात लागू झाले आहे. देशातील ४० कोटी कामगारांना या नव्या कायद्याचा लाभ मिळणार आहे.

देशातील वेगवेगळे २९ जुने कायदे एकत्र करीत हे चार नवीन कायदे तयार करण्यात आले, याकडे लक्ष वेधत मांडविया यांनी म्हटले की, हे चार नवीन कायदे देशात लागू झाल्यामुळे कामगारांच्या जीवनात आमूलाग्र असे बदल होणार असून, त्यांचे जीवनमान उंचावणार आहे.

या चार नव्या कायद्यांतून कामगारांना वेळोवेळी किमान वेतनाची हमी मिळेल, यामुळे त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य येईल, तरुणांना नियुक्तीपत्राची हमी मिळेल, यामुळे त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होईल. महिलांना समान वेतन आणि कार्यक्षेत्रात सन्मानाची वागणूक मिळेल. यामुळे कार्यक्षेत्रात लैंगिकतेच्या आधारावर होणाऱ्या भेदभावाला आळा बसेल. एवढेच नाही तर, देशातील ४० कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षेची हमी मिळणार आहे.

निश्चित अवधीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कामगारांना एक वर्षानंतर भविष्यनिर्वाह निधी आणि ग्रॅच्युटीची हमी, ४० वषपिक्षा जास्त वयाच्या कामगारांना वर्षातून एकदा निःशुल्क आरोग्य तपासणीची हमी, अतिरिक्त वेळेत (ओव्हरटाईम) काम केले तर दुप्पट पगाराची हमी मिळणार आहे. धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना १०० टक्के आरोग्य सुरक्षेची हमी तसेच आंतरराष्ट्रीय मानकानुसार कामगारांना सामाजिक सुरक्षेची हमी या चार नव्या आणि सुधारित कायद्यातून मिळणार असल्याचे मांडविया यांनी सांगितले.

हे साधारण बदल नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामगार क्षेत्रात व्यापक कल्याणासाठी केलेले महत्वपूर्ण असे बदल असून यामुळे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आपली अधिक वेगाने वाटचाल सुरु होणार असल्याचे मांडविया यांनी सांगितले. देशातील बदलत्या परिस्थितीशी देशातील जुन्या कामगार कायद्याची सांगड घालण्यासाठी तसेच कामगारांच्या व्यापक कल्याणाच्या दृष्टीने अनेक आवश्यक सुधारणा या कायद्यातून करण्यात आल्या असत्याचे मांडविया यांनी स्पष्ट केले.

  • नवीन कामगार सुधारणा कायदे स्वावलंबी भारताच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे विकसित भारत २०४७च्या ध्येयाला नवीन चालना मिळेल. कामगारांच्या कल्याणासाठी घेतलेला हा निर्णय भविष्यासाठी तयार असलेले कामगार आणि मजबूत उद्योगांसाठी सहाय्यक ठरेल. कामगारांना सुरक्षा हमी देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला.
    मनसुख मांडविया, केंद्रीय कामगार मंत्री
  • आमच्या सरकारने चार सुधारित कामगार कायदे लागू केले. स्वातंत्र्यानंतर कामगारांच्या हितासाठी हा सर्वात मोठा निर्णय आहे. यामुळे देशातील कामगारांना मोठ्या प्रमाणात सक्षमता मिळेल, तसेच व्यवसाय सुलभतेला देखील चालना मिळेल. सामाजिक सुरक्षा, वेळेवर वेतन आणि सुरक्षित कार्यस्थळ सुनिश्चित करण्यासाठी सुधारित कायद्यातील तरतुदी महत्त्वाच्या ठरतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---