---Advertisement---
जळगाव : एमएसएमई मध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम अशा अनेक उद्योग व्यवसायांचा समावेश असून या उद्योगांना चालना मिळावी, आर्थीक बळ मिळावे, यासाठी केंद्र सरकारच्या अर्थ विभागाने विविध सवलती जाहीर केल्या आहेत. त्याअंतर्गत जळगाव जिल्हा अग्रणी बँक अर्थात सेट्रल बँक ऑफ इंडियातर्फे ४० कोटीं रूपयांच्या कर्ज वितरणास मंजूरी दिली आहे.
त्यानुसार जिल्हा अग्रणी बँकेचा बँकेच्या एमएसएमई मेगा क्रेडिट आऊटरीच कार्यक्रमांतर्गत एमआयडीसी परिसरातील प्रेसिडेंट कॉटेज अजिंठा रोड येथे कर्ज वितरण मेळावा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी जिंदाचे अध्यक्ष ताथा उद्योजक रवींद्र लढ्ढा, संगीता पाटिल, दाल मिल असोसिएशनचे सचिव आर. सी. जाजू, प्लास्टिक प्रोसेसिंग उद्योगाचे विनोद बियाणी, प्रादेशिक अधिकारी सुनील घाटे, ऑइल मिल उद्योगाचे विकास महाले, प्रादेशिक कार्यालय पुणे सहायक महाव्यवस्थापक डी. व्ही. कुमार, जळगाव प्रादेशिक व्यवस्थापक रमेश जेठानी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुनील दोहरे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, तसेच विविध उद्योजक, उद्योगपती, स्टार्टअप प्रतिनिधी आदि उपस्थित होते.
40 कोटी कर्ज वितरणास मान्यता
दरम्यान, लीड बँकेच्या शाखांमधील ग्राहकांना विविध व्यावसायिक उपक्रमांसाठी कर्ज सुविधांसाठी मंजुरी पत्रे वाटप करण्यात आली असून सेंट्रल बँक ऑफ इंडियाअंतर्गत सुमारे ४० कोटींच्या एमएसएमई कर्ज वितरणास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे लीड बँक व्यवस्थापक दोहरे यांनी म्हटले आहे. यावेळी उद्योजक रवींद्र लढ्ढा, संगीता पाटिल, जाजू आदि मान्यवरांनी विविध मार्गदर्शनपर सूचना दिल्या.
ग्राहकांचे समाधान आणि वेळेवर सेवा
लिड बँकेच्या विविध योजना, सुविधा आणि एमएसएमईसंबंधित उत्पादनाविषयी सविस्तर सादरीकरणही करण्यात आले. यासंदर्भात बँकेची कार्यप्रणाली, व्यावसायीकांना कर्ज वितरण प्रणालीसह ग्राहकाभिमुख उत्पादनाविषयी माहिती दिली. तसेच ग्राहकांच्या समाधानाचे आणि वेळेवर सेवा देण्याच्या महत्त्वावर भर देत त्यांनी कृषी, औद्योगीक तसेच पूरक वातावरण उत्पादनांना प्रोत्साहन देणाऱ्या उद्योजक ग्राहकांचे विभागीय अधिकारी डी. व्ही. कुमार आणि प्रादेशिक व्यवस्थापक रमेश जेठानी यांनी कौतुक केले.









