पालकांनो, अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देताय‌? सावधान… अन्यथा बसेल मोठा फटका

---Advertisement---

 

नंदुरबार : जिल्ह्यातील वाहनमालक-पालकांनी वाहन अल्पवयीन मुलांना चालविण्यांस देऊ नये; अन्यथा केंद्रीय मोटार वाहन अधिनियमांतर्गत वाहनमालक- चालकांना २५ हजार दंड आणि तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकेल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी सांगितले.

उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सूचनेनुसार, अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९९ ‘अ’नुसार, वाहनमालक दोषी धरले जातील. वाहनमालक चालकांना २५ हजार दंड आणि तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

दोषी वाहनाची नोंदणी बारा महिन्यांसाठी (एक वर्षासाठी) रद्द करण्यात येईल. गुन्हा करणाऱ्या अल्पवयीन मुलाला वयाच्या २५ वर्षांपर्यंत वाहन चालविण्याचा परवाना नाही. (अनुज्ञप्ती) मिळणार अल्पवयीन मुलांच्या मोठ्या निष्काळजीपणामुळे प्रमाणात अपघात होण्याची शक्यता असते, ज्यामुळे केवळ अल्पवयीन मुलांचेच नव्हे; तर इतर नागरिकांचे जीवनही धोक्यात येते. त्यामुळे, सर्व वाहनमालक पालकांनी आपले वाहन १८ वर्षे वयाखालील मुलांना चालविण्यास देऊ नये, असेही आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जाधव यांनी केले आहे.

परवानाधारक वाहनातून पाल्यांना शाळेत पाठवावे

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी जिल्ह्यातील सर्व पालकांनी पाल्यांना शाळेत पाठवताना परवानाधारक स्कूलबस- व्हॅनमधूनच शाळेत पाठवावे. अवैध रिक्षा किंवा इतर परवाना नसलेल्या वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक केल्यास अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे पालकांनी मुलांना शाळेत पाठविताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---