सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे भाव वधारले, जाणून घ्या दर

---Advertisement---

 

जळगाव : सोने-चांदीचे भाव सलग दुसऱ्या दिवशी वधारले असून चांदीच्या भावात दोन हजार रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ६० हजार ५०० रुपयांवर पोहचली आहे. तसेच सोन्याच्या भावात ९०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख २६ हजार २०० रुपयांवर पोहोचले आहे.

गेल्या आठवड्यापासून सोने-चांदीच्या भावात सतत चढ-उतार सुरू होता. मात्र आता मंगळवार व बुधवार सलग दोन दिवस भाववाढ झाली. मंगळवारी चांदीच्या भावात ३५०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ५८ हजार ५०० रुपयांवर पोहोचली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी पुन्हा दोन हजार रुपयांची वाढ झाली.

त्यामुळे चांदी एक लाख ६० हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. अशाच प्रकारे २५ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या भावात २३०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख २५ हजार ३०० रुपयांवर पोहोचले होते. २६ नोव्हेंबर रोजी त्यात पुन्हा ९०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख २६ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.

चांदी उच्चांकीवर

मध्यंतरी चांदीच्या भावात मोठी वाढ होऊन तिने नवनवीन उच्चांक गाठले. मात्र ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले. मात्र ते आता पुन्हा वाढत जाऊन २६ नोव्हेंबर रोजी एक लाख ६० हजार ५०० रुपयांवर पोहोचले. या भाववाढीमुळे चांदी सव्वा महिन्याच्या उच्चांकीवर पोहोचली आहे. यापूर्वी २१ ऑक्टोबर रोजी चांदी एक लाख ६२ हजार व दुसऱ्या दिवशी एक लाख ५४ हजार रुपयांवर होती.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---