---Advertisement---
WPL Auction 2026 : महिला प्रीमियर लीग (WPL २०२६) च्या नवीन हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव गुरुवार, २७ नोव्हेंबर रोजी होत आहे. या वर्षी, WPL मध्ये एक मेगा लिलाव होणार आहे, जो अनेक प्रमुख खेळाडूंचे भवितव्य ठरवेल. लिलाव सुरू झाला असून, सोफी डेव्हाईन गुजरात संघाच्या ताफ्यात दाखल झाली आहे, अर्थात सोफी डेव्हाईन गुजरात संघात सामील करून घेतले आहे.
२०२६ च्या WPL हंगामासाठीचा लिलाव गुरुवारी नवी दिल्लीत दुपारी ३:३० वाजता सुरु झाला आहे. यावेळी, लीगचे तीन वर्षांचे चक्र पूर्ण झाल्यामुळे, अनेक प्रमुख खेळाडू लिलावात सहभागी झाले आहेत.
या मेगा लिलावापूर्वी, प्रत्येक फ्रँचायझीला जास्तीत जास्त पाच खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी होती. परिणामी, अनेक प्रमुख आणि दमदार खेळाडूंना विक्रीसाठी जावे लागले आहे आणि दिल्ली कॅपिटल्सने सोडलेला जोनासेन त्यापैकी एक आहे.
जोनासनने मागे घेतले नाव
जोनासनने नवीन हंगामासाठी लिलावात तिचे नाव सादर केले होते, परंतु २७ नोव्हेंबर रोजी तिने लिलावातून माघार घेतल्याची बातमी समोर आली. वृत्तानुसार, ३३ वर्षीय ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू जेस जोनासनने दुखापतीमुळे हा निर्णय घेतला. जोनासनला खांद्याची दुखापत झाली आहे आणि ती काही काळापासून त्यातून सावरत आहे आणि सध्या ती कोणत्याही स्थितीत नसल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच तिने तिचे नाव मागे घेतले.








