---Advertisement---
Jalgaon Gold Rate : आठवडाभरापासून भाववाढ सुरू असलेल्या सोने-चांदीच्या भावात घसरण झाली आहे. यामध्ये सोने एक हजार ६०० रुपयांनी घसरून एक लाख २७ हजार ६०० रुपयांवर आले आहे, तर चांदीच्या भावात एक हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ती एक लाख ७७ हजार ५०० रुपयांवर आली आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर दलालांनी विक्री वाढविल्याने सोने व चांदीच्या दरात घसरण झाली असल्याची माहिती जळगाव शहरातील सुवर्ण व्यावसायिकांनी दिली. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सोने-चांदीच्या भावात पुन्हा वाढ सुरू झाली होती.
यामध्ये २५ नोव्हेंबर रोजी, सोने दोन हजार ३०० रुपयांनी वधारून एक लाख २५ हजार ३०० रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर दररोज भाववाढ कायम राहत १ डिसेंबरपर्यंत ते एक लाख २९ हजार २०० रुपयांपर्यंत पोहोचले. मात्र, २ डिसेंबर रोजी त्यात एक हजार ६०० रुपयांची घसरण होऊन ते एक लाख २७ हजार ६०० रुपये प्रतितोळ्यावर आले.
अशाच प्रकारे २५ नोव्हेंबर रोजी तीन हजार ५०० रुपयांची वाढ होऊन चांदी एक लाख ५८ हजार ५०० रुपयांवर पोहोचली होती. चांदीत सतत मोठी वाढ होत जाऊन १ डिसेंबरपर्यंत ती एक लाख ७८ हजार रुपयांपर्यंत पोहोचली होती.
२४ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या सात दिवसांत चांदी २३ हजार रुपयांनी वधारली होती. मात्र, २ डिसेंबर रोजी त्यात एक हजार ५०० रुपयांची घसरण झाली व ती एक लाख ७६ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर आली आहे.









