---Advertisement---
भुसावळ : मध्य रेल्वेमार्फत रेल्वे बोर्डाच्या तत्काल बुकिंग बदल निर्देशांनुसार, प्रणालीमध्ये महत्त्वपूर्ण करण्यात येत आहेत. आता तत्काल तिकिटे फक्त सिस्टमद्वारे पाठविण्यात येणाऱ्या वन टाइम पासवर्ड (ओटीपी) सत्यापनानंतरच जारी करण्यात येतील. बुकिंगच्या वेळी प्रवाशांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर हा ओटीपी पाठविण्यात येईल. ओटीपीचे यशस्वी सत्यापन झाल्यावरच तिकिट जारी केले जाईल.
वन टाइम पासवर्ड (ओटीपी) आधारित तत्काल प्रमाणीकरण प्रणाली ०१ डिसेंबर रोजी रात्री ००:०० वाजेपासून लागू होणार आहे. प्रारंभी खालील गाड्यांसाठी ही प्रणाली राबविण्यात येईल : गाडी क्रमांक २२२२१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस ५ डिसेंबर (००:०० वाजेपासून) गाडी क्रमांक १२०२५ पुणेसिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेस दिनांक ०१ डिसेंबर २०२५ (००:00 वाजेपासून)नवीन प्रणाली कंप्यूटरीकृत पीआरएस काउंटर, अधिकृत एजंट, आईआरसीटीसी वेबसाइट आणि आईआरसीटीसी मोबाइल अॅप यांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या सर्व तत्काल बुकिंगवर लागू राहील. या बदलाचा उद्देश तत्काल बुकिंग प्रक्रिया अधिक पारदर्शक बनविणे तसेच वास्तविक प्रवाशांना तातडीची तिकिटे अधिक सुलभतेने उपलब्ध करून देणे हा आहे.
प्रवाशांनी बुकिंगच्या वेळी वैध म ोबाईल क्रमांक जरूर प्रदान करावा, जेणेकरून ओटीपी सत्यापन प्रक्रिया निर्विघ्न रीत्या पूर्ण होऊ शकेल. मध्य रेल्वेने सर्व प्रवाशांना या महत्त्वपूर्ण बदलाची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे.









