जळगाव जिल्ह्यात खुनाची मालिका सुरूच; आठवडाभरानंतर पुन्हा एका १८ वर्षीय तरुणाला संपवलं!

---Advertisement---

 

जळगाव : जळगाव जिल्ह्यात खुनाची मालिका सुरूच आहे. आठवडाभरानंतर पुन्हा एका १८ वर्षीय तरुणाचा बेदम मारहाण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तुषार चंद्रकांत तायडे (१८) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रानुसार, मयत तुषार चंद्रकांत तायडे (१८) हा जळगाव शहरातील समता नगरात आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. दरम्यान, तुषार हा मंगळवारी (दि. २ डिसेंबर) यावलच्या वड्डी परसाडे येथे आजीचे निधन झाल्यामुळे तो अंत्यविधीसाठी गेला होता. अंत्यविधी आटोपल्यानंतर तो जळगावात परत येण्यासाठी निघाला असता, त्याला काही तरुणांनी घेरले.

त्यानंतर त्याला बेदम मारहाण करून संशयित आरोपी पसार झाले. दरम्यान, तुषार याला काही नागरिकांनी गंभीर जखमी अवस्थेत यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, काही वेळात उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. यामुळे नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.

जुन्या वादातून मारहाण


तुषार याचे काही महिन्यांपूर्वी काही लोकांशी वाद झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. याच वादातून त्याला मारहाण करण्यात आल्याचा अंदाज लावला जात असून, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

संशयितांविरोधात गुन्हा दाखल

ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २ डिसेंबर) रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---