---Advertisement---
Virat Kohli : कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला भारतीय सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अर्थात तो ‘या’ स्पर्धेत खेळण्यास सज्ज झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान, विराट कोहलीने ही महत्वाची घोषणा केली असून, यामुळे चाहत्यांचा आनंद द्विगुण झाला आहे.
भारतीय सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही शानदार कामगिरी करत, ५३ वे एकदिवसीय शतक झळकावले. त्यानंतर पत्नी अनुष्का शर्मा हिने या ऐतिहासिक खेळीवर प्रेमळ प्रतिक्रिया दिली आहे.
अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर विराट कोहलीच्या शतकाच्या सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये हृदयस्पर्शी इमोजीसह आनंद व्यक्त केला आहे. एकदिवसीय क्रिकेट इतिहासात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराटचे हे सातवे शतक आहे.
अनुष्का शर्माच्या पोस्टवरून हे देखील स्पष्ट झाले आहे की ती इंग्लंडमधून सामना पाहत होती. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती यूकेच्या एका टीव्ही चॅनेलवर सामना पाहत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
खरं तर चार महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतल्यानंतर विराट कोहलीची बॅट पुन्हा गर्जना करत आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात नाबाद ७४ धावा केल्या आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन्ही एकदिवसीय सामन्यात शतके झळकावली आहेत. त्याने रांचीच्या एकदिवसीय सामन्यात १३५ धावांची खेळी खेळली. आता त्याने रायपूरमध्ये १०२ धावा केल्या आहेत.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराटने शतक झळकावताना, त्याने त्याच्या गळ्यात लटकलेल्या लॉकेटचे चुंबन घेतले. अनुष्का शर्मा आणि त्याच्या दोन्ही मुलांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याने हे केले, असा दावा करण्यात आला आहे.
विराटची मोठी घोषणा
कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला स्टार भारतीय फलंदाज विराट कोहलीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अर्थात २४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराट कोहली दिल्लीची जर्सी घालण्यास तयार झाला आहे.
डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली यांनी सांगितले की, भारतीय सुपरस्टार विराट कोहलीने विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी त्याची उपलब्धता निश्चित केली आहे.
कोहलीने शेवटचा विजय हजारे ट्रॉफीमध्ये फेब्रुवारी २०१० मध्ये सर्व्हिसेसविरुद्ध खेळला होता, ज्यामुळे तो जवळजवळ १६ वर्षांनी लिस्ट ए डोमेस्टिक क्रिकेटमध्ये परतला असून, यामुळे चाहत्यांचा आनंद द्विगुण झाला आहे.









