नशिराबादमध्ये पेट्रोल भरण्यावरून हाणामारी; पोलिस ठाण्यात मोठी गर्दी

---Advertisement---

 

नशिराबाद, प्रतिनिधी : पेट्रोल भरण्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणाचा पंपवरील कर्मचारी यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. ही घटना नशिराबाद-जळगाव सर्व्हिस रोडवरील पार्श्वनाथ पेट्रोल पंपावर बुधवारी संध्याकाळी ५.३० वाजता घडली.

नशिराबाद-जळगाव सर्व्हिस रोडवरील पार्श्वनाथ पेट्रोल पंपावर बुधवारी संध्याकाळी ५.३० वाजता पेट्रोल भरण्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणाचा पंपवरील कर्मचारी यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. तरुणाने गावातील मित्र-नातेवाइकांना बोलावल्याने पंपावर मोठा जमाव जमला. त्यानंतर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत नशिराबाद पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती. दरम्यान, ही सर्व घटना पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे.

पेट्रोल पंपावरील कर्मचारी व तरुणातील वादाची घटना कळाल्यानंतर नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर संबंधिताची पोलिस ठाण्यात चौकशी करण्यात आली.

या वेळी पोलिस स्थानकात दोन्ही गटातील नातेवाईक व समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. नशिराबाद पोलिसांनी तरुणांना लाठीने मारहाण करून गर्दीला पांगवले. या वेळी संतप्त जमावाने आरडाओरड केली. मारहाणीसंदर्भात तक्रार नसल्याचे सहायक पोलिस निरीक्षक आत्माराम मनोरे यांनी सांगितले.

पत्रकार मंचकडून पोलिसांचा निषेध

दरम्यान, घटनेची माहिती घेण्यास पत्रकार पोलिस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांनी पत्रकारांना अरेरावीची वागणूक दिली. याबाबत नशिराबाद पत्रकार मंचने पोलिसांचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---