दिलासादायक! अखेर अत्याचारात मृत पावलेल्यांच्या १७ कुटुंबांना मिळाली सरकारी नोकरी

---Advertisement---

 

धुळे : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियमांतर्गत दाखल झालेल्या खून किंवा अत्याचाराने मृत्यू झालेल्या प्रकरणांमधील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसाला गट-क व गट-ड संवर्गातील शासकीय/निमशासकीय पदावर नोकरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यात जिल्ह्यातील १७ जणांना लाभ मिळाला आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २० नोव्हेंबर २०२५ रोजी हा शासन निर्णय जारी केला आहे. यामध्ये धुळे जिल्ह्यातील साक्री, धुळे, शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यांतील १७प्रकरणांचा समावेश आहे. शासन निर्णय जारी झाल्यानंतर १ डिसेंबर रोजी १५ पीडित कुटुंबीयांची बैठक सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात घेण्यात आली.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या १७ कुटुंबांपैकी अद्याप एकाही कुटुंबाचा प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. त्यामुळे संबंधित कुटुंबांनी तातडीने पात्र वारसाला नोकरी मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल करणे आवश्यक आहे.

यासाठी पात्र वारसदारांनी शासन 3 निर्णयामध्ये नमूद केलेले परिशिष्ट १ ते ६ आणि संपूर्ण आवश्यक दस्तऐवजांसह अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, साक्री रोड येथे जमा करावेत.

जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते ३ आणि सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण संजय सैंदाणे यांनी संयुक्तपणे हे आवाहन केले आहे. या निर्णयामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---