---Advertisement---
झाशी : उत्तरप्रदेशातील झाशी सध्या एसआयआर प्रक्रियेमुळे चर्चेत आहे. या दरम्यान, अमिताभ बच्चन आणि त्यांच्या वडील हरिवंश राय बच्चन यांची नावे मतदार सूचीमध्ये आल्याने खळबळ उडाली आहे. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, ओरछा गेटजवळील खुशीपुरा परिसरातील मतदार यादीत अमिताभ बच्चन यांचे नाव आणि घर क्रमांक ५४ नमूद आहे. यादीनुसार, त्यांनी २००३ मध्ये मतदान केले असून, त्यांच्या असून, वयाची नोंद ७६ वर्षे असल्याचे सांगितले आहे.
परिसरातील शेजाऱ्यांनी स्पष्ट केले की त्यांनी अमिताभ बच्चन यांना प्रत्यक्ष पाहिलेले नाही; ते फक्त चित्रपटांमध्येच पाहिले आहेत. एका वृत्तानुसार, घर क्रमांक ५४ वर अमिताभ बच्चन यांच्या नावासोबतच राजेश कुमार यांचे पुत्र सुरेंद्र कुमार (७६) यांचेही नाव नोंदणीकृत आहे. यादीत ५४३ आणि ५४४ क्रमांकावरही मतदारांची नावे आहेत. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे घर क्रमांक ५४ ही जागा प्रत्यक्षात एका मंदिराची आहे. या चुकीमुळे प्रशासनात गोंधळ उडाला, विभागीय अधिकारी चिंतेत आहेत आणि चौकशीची मागणी केली जात आहे. विभागातील जबाबदाऱ्या आणि नावे चुकीच्या नोंदीबाबत चर्चा तीव्रपणे सुरू आहेत,









