आनंदवार्ता! मध्य रेल्वे चालवणार अतिरिक्त विशेष रेल्वे सेवा

---Advertisement---

 

भुसावळ : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून विशेष गाड्यांचे नियोजन केले असून त्या ‘ऑन डिमांड स्पेशल’ म्हणून चालविण्याची घोषणा करण्यात आली आहे. या विशेष गाड्या विविध महत्त्वाच्या गंतव्यस्थानांदरम्यान चालविण्यात येणार असून, प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते बिलासपूर विशेष गाडी – गाडी क्रमांक ०८२४६ विशेष १२ डिसेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.१५ वाजता सुटेल आणि बिलासपूर येथे २०.१५ वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक ०८२४५ – १० डिसेंबर रोजी बिलासपूर येथून १७.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १३.३० वाजता पोहोचेल. थांबे ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, अकोला, नागपूर, गोंदिया, दुर्ग आणि रायपूर. कोच संरचना एकूण २० कोच एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी, १० शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.

मुंबई ते हावडा विशेष गाडी – गाडी क्रमांक ०२८६९ विशेष दि.८ डिसेंबर २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ११.०५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी हावडा येथे २०.५५ वाजता पोहोचेल.

थांबे -कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, राउलकेला, टाटानगर आणि खडकपूर. कोच संरचना एकूण २१ कोच एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, २ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ४ वातानुकूलित तृतीय श्रेणी, २ वातानुकूलित इकॉनोमी तृतीय श्रेणी, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि जनरेटर कार.

मुंबई ते नागपूर विशेष गाडी – थांबे – दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा आणि वर्धा. कोच संरचना एकूण १८ कोच ४ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, १२ वातानुकूलित तृतीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.

सियालदाह लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी – गाडी क्रमांक ०३१२८ विशेष ९ डिसेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०६.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सियालदाह येथे १९. ३० वाजता पोहोचेल. थांबे कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, सासाराम, गया, कोडरमा, धनबाद, आसनसोल, दुर्गापूर, वर्धमान, बंडेल आणि नैनहाटी.

कोच संरचना एकूण २१ कोच एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ५ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.

थांबे ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाल, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, उरई आणि कानपूर सेंट्रल. कोच संरचना एकूण २२ कोच १ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ६ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि १ साम ान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि जनरेटर कार.

पुणे ते हजरत निजामुद्दीन विशेष गाडी – गाडी क्रमांक ०१४१० विशेष ९ डिसेंबर रोजी हजरत निजामुद्दीन येथून ५.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पुणे येथे ९.०० वाजता पोहोचेल. थांबे दौंड कॉड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाल, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, ग्वालियर आणि आग्रा कॅन्ट कोच संरचना एकूण १८ कोच
१६ वातानुकूलित तृतीय श्रेणी, २ जनरेटर कार. प्रवाशांनी या विशेष गाड्यांच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---