फसवणूकीच्या दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीस चाळीसगावातुन येथून अटक, ११ पर्यंत पोलीस कोठडी

---Advertisement---

 

पाचोरा : फसवणूक प्रकरणी पाचोरा पोलिसात दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीस चाळीसगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. सोमवारी या आरोपीस पाचोरा न्यायालयात हजर केले असता ११ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या घटनेबाबत १९ नोव्हेंबर रोजी पाचोरा पोलिसात फिर्यादी अजय सुरेश करवंदे (वय २९, रा. पिंपळगाव हरे., ता. पाचोरा) हे ॲक्सीस बँकेत पाचोरा येथे कामानिमित्त गेले असता तेथे बँकेच्या बाहेर पाचोरा टी नावाच्या टपरीवर त्यांचा राहुल साहेबराव महाजन (रा. कजगाव ता. भडगाव) याच्याशी परिचय झाला होता. त्यावेळी राहुल महाजन याने सांगितले की, माझे व माझा भाऊ योगेश साहेबराव महाजन (रा. बांबरुड ता. भडगाव) अशा दोघांचे मॅक्स्गेन बाजार नावाचे पाचोरा शहरात गाळा नं. ४, ५ बालाजी टावर पुनगाव रोड येथे आमचे ऑफिस आहे. तुम्ही आमच्या ऑफिसला या, तुम्हाला ३६ लाख रुपये किमतीचे घर पुनगाव रोड लगत रो हाउस घेऊन देतो, असे आश्वासन दिले होते.

त्यानंतर सन २०२३ मध्ये नोव्हेंबर महिन्याच्या १९ तारखेपासून ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत फिर्यादीसह पत्नी भाग्यश्री व त्याचा मित्र अन्वर रफिक शहा फकीर (रा. पिंपळगाव हरे., ता. पाचोरा) यांनी राहुल महाजन व योगेश महाजन यांच्या मॅक्स्गेन बाजार नावाचे ऑफिसमध्ये जावून दोन-दोन लाख रुपये वेळोवेळी असे एकूण दहा लाख रुपये फिर्यादीची पत्नी व त्याचा मित्र अन्वर याचे समक्ष दिले. व उर्वरीत रक्कम एनईएफटी माध्यमाने १२ लाख ४० हजार रुपये दिले आहे. या व्यवहारावर फिर्यादीचा दोन्ही भावांनी विश्वास संपादन केला व फिर्यादीकडून एकूण २२ लाख ४० हजार रुपये घेतले.

फिर्यादीने पिंपळगाव हरे. येथील घर तारण ठेवून ॲक्सीस बँकेकडून १४ लाख ५० हजार रुपये कर्ज घेऊन १२ लाख ४० हजार रुपये हे वरील दोघे इसमांच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन हस्तास्तरीत केले. त्यांचे बॅक स्टेटमेंट पुरावा म्हणून जोडले आहे. उवर्रीत १० लाख रुपये फिर्यादीची पत्नी भाग्यश्री अजय करवंदे व मिञ अनवर रफीकशहा फकीर वरील दोन्ही भाऊ राहुल व योगेश यांचे मॅक्स्सोन बाजार नावाचे ऑफीस पाचोरा यांचे कार्यालयात जावून वरील दोन्ही भावांना रोख व आंनलाईन २२ लाख ४० हजार रुपये दिले तसेच वरील दोन्ही भावांनी फिर्यादीस टोना या नावाने मासे परदेशात आयात निर्यात करण्याचा व्यवसाय करतो म्हणून रक्कम गुंतवणूक करायचीदेखील सांगितले होते. राहुन महाजन, योगेश महाजन यांनी एका वर्षात ठरल्याप्रमाणे एका वर्षात प्लॉटसह घर बांधून वेळेत न दिल्याने फिर्यादीने पैसे परत मागीतले असता त्यांनी फिर्यादीस ६ लाख रुपये व साडेसहा लाख असे साडेबारा लाख असे दोन चेक लिहून दिले होते. त्यावर तारीख टाकलेली नव्हती. त्यांनी सांगितले की, सध्या खात्यात पैसे नाही. तीन महिन्यांनी चेक जमा करा, तोपर्यत उर्वरित पैसे कॅश देतो. परंतु दोन्ही भावांनी फिर्यादीस रक्कम परत केली नाही. नंतर फिर्यादीने चेक जमा केल्याचा विचार केला असता राहुल महाजन स्पष्टपणे फिर्यादीस म्हणाला की, आम्ही दोघे भाऊ तुझे पैसे परत करणार नाही आणि बँकेत चेक टाकू नकोस. माझ्या खात्यात पैसे नाहीत. त्यामुळे फिर्यादीची खात्री झाली की, राहुल साहेबराव महाजन (रा. कजगाव ता. भडगाव), योगेस साहेबराव महाजन (रा. बांबरुड ता. भडगाव) यांनी फसवणूक केली आहे, अशी फिर्याद पाचोरा पोलिसात दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी फरार आरोपींचा शोध घेत होते. अखेर पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत फरार आरोपीची माहिती मिळाल्याने निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल शिंपी व शरद पाटील यांनी ७ डिसेंबर रोजी चाळीसगाव बायपास रोडवरील वनविभाग कार्यालय येथून आरोपी राहुल साहेबराव महाजन (रा. कजगाव, ता. भडगाव) यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. या आरोपीस सोमवारी पाचोरा न्यायालयात हजर केले असता ११ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीचा भाऊ योगेश साहेबराव महाजन (रा. बांबरुड, ता. भडगाव) हा अद्याप फरार आहे. पाचोरा पोलीस त्याचाही शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा तपास स्वतः पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार हे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---