…तर देशाचे विभाजन टळले असते : अमित शाह

---Advertisement---

 

नवी दिल्ली : काँग्रेसने वंदे मातरमचे दोन तुकडे केले, त्यामुळे देशाचे विभाजन झाले, काँग्रेसने वंदे मातरमचे दोन तुकडे केले नसते, तर देशाचे विभाजन टळले असते, असा घणाघाती हल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यसभेत चढवला.

वंदेमातरमला १५० वर्श वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राज्यसभेत या विषयावरील विशेष चर्चेत सहभागी होतांना अमित शाह यांनी या मुद्यावरुन पंडित जवाहरलाल नेहरु आणि काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. वंदेमातरम राष्ट्राच्या शुध्द आत्म्याशी जुळलेले गीत आहे, असे महात्मा गांधी यांनी म्हटले होते, याकडे लक्ष वेधत शाह म्हणाले की, मात्र काँग्रेसचा सुरुवातीपासुनच वंदे मातरमला विरोध आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांचा तर वंदे मातरम म्हणण्यालाही विरोध होता. अशा नेत्यांची नाव मी सायंकाळपर्यंत सभागृहाच्या पटलावर ठेवायला तयार आहे, त्याला तुम्ही कामकाजात सहभागी करुन घ्यावे.

दुसरीकडे वंदे मातरमच्या वेळी भाजपाचे सर्व सदस्य उभे असतात, भाजपा सदस्यांकडून कधीच वंदे मातरमचा अनादर केला जात नाही. जवाहरलाल नेहरुंनी मुस्लिम तुष्टीकरणासाठी वंदे मातरमचे दोन तुकडे केले, त्याची परिणती देशाच्या फाळणीत झाली, असा आरोप करत शाह म्हणाले की, वंदे मातरमचा विरोध हा नेहरूंपासून काँग्रेसच्या सर्व नेत्यांच्या रक्तात भिनला आहे, त्यामुळे अनेक वेळा सभागृहात वंदे मातरम सुरु असतांना काँग्रेसचे नेते उभे राहात नाही, सभागृहातून निघून जातात. अशा अनेक नेत्यांची नाव मला माहित आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---