---Advertisement---
Jalgaon Weather : उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणारे गार वारे वेगाने वाहू लागले असून यामध्ये आणखी वाढ झाली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात अजून काही दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
राज्यभरातील अनेक शहरांचे किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास किंवा खाली गेले आहे. बुधवारी जळगाव शहराचा पारा ७ अंशापर्यंत घसरल्याची नोंद ममुराबाद वेधशाळेत झाली आहे.
अशात जिल्ह्यात अजून काही दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. शहरात बुधवारी रात्री या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली असून येथून शीत वारे महाराष्ट्राकडे वाहत आहेत. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील अनेक शहरांचे किमान तापमान ६ ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात येत आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या विभागांचा समावेश आहे.









