साहिबगंज अभयारण्यात दिसला दुर्मिळ स्थलांतरित पक्षी, जैवविविधतेसाठी अत्यंत महत्त्वाचा

---Advertisement---

 

झारखंडमधील साहिबगंज जिल्ह्यातील उधवा पक्षी अभयारण्यात जवळपास एका दशकानंतर ‘पॅलस गल’ नावाचा एक दुर्मिळ स्थलांतरित पक्षी दिसला. बुधवारी संध्याकाळी पक्षी निरीक्षकांना उधवा पक्षी अभयारण्यात, एक किशोरवयीन पॅलस गल म्हणजेच पॅलस कुरव दिसला, असे साहिबगंजचे विभागीय वन अधिकारी प्रबल गर्ग यांनी सांगितले.

हा पाणथळ जागी राहणारा एक दुर्मिळ स्थलांतरित पक्षी आहे. हा पक्षी शेवटचा २०१५ मध्ये पक्षी गणनेदरम्यान दिसला होता. जवळपास एका दशकानंतर त्याचे परत येणे हे पक्षी अभयारण्याच्या जैवविविधतेसाठी एक सकारात्मक चिन्ह असल्याचा दावा वन अधिकाऱ्याने केला. ही प्रजाती दक्षिण रशियापासून मंगोलियापर्यंतच्या दलदलीच्या जागा आणि बेटांवर वसाहतींमध्ये प्रजनन करते. हा पक्षी आहे पूर्व भूमध्यसागर, अरेबिया आणि भारतात हिवाळ्यात वास्तव्य करतो. हा सीगल जमिनीवर घरटे बांधतो आणि दोन ते चार अंडी घालतो. सर्व स्थलांतरित पक्षी वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित आहेत आणि त्यांना किंवा त्यांच्या अधिवासाला कोणतेही नुकसान पोहोचवणे हा कायद्यानुसार दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. यासाठी ७वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते असे अधिकाऱ्याने सांगितले.

१८ कुटुंबांतील पाणथळ पक्ष्यांची नोंद

या वर्षी जानेवारीत झालेल्या जनगणनेदरम्यान, १८ कुटुंबांतील पाणथळ पक्ष्यांच्या ६० प्रजातींची नोंद करण्यात आली. एकूण ६० प्रजातींपैकी ३३ टक्के स्थानिक पक्षी, ३२ टक्के स्थानिक स्थलांतरित आणि ३५ टक्के हिवाळी स्थलांतरित पक्षी होते. उधवा तलाव पक्षी अभयारण्यात एकूण १०,०३१ पक्ष्यांची नोंद झाली, असे प्रकाश यांनी सांगितले.

हे ही पक्षी येतात भारतात

हिवाळ्यात सर्वाधिक येणाऱ्या पाहुण्यांमध्ये बार-हेडेड हंस, नॉर्दर्न पिंटेल, कॉमन टील, ग्रेलेग हंस, गॅडवॉल, स्पॉट-बिल्ड बदक आणि रेड-क्रेस्टेड पोचार्ड यांचा समावेश आहे. जांभळे बगळे, एशियन ओपनबिल, लिटल ग्रीब आणि किंगफिशर हे पक्षीही आढळतात.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---