स्वदेशी बनावटीची हायड्रोजन ट्रेन तयार, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

---Advertisement---

 

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने हायड्रोजनवर चालणारी आणि स्वदेशी बनावटीची देशातील पहिली ट्रेन तयार झाली असून, ती लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली.

वैष्णव यांनी सांगितले की, देशाची पहिली हायड्रोजन ट्रेन रिसर्च, डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशनच्या मानकांनुसार पूर्णतः स्वदेशी पद्धतीने तयार करण्यात आली आहे. ही ट्रेन सर्वात शक्तिशाली आणि सर्वात अधिक लांबीची असून, भारताचे अभियांत्रिकीचे सामर्थ्य दर्शवते. ट्रेन चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या ग्रीन हायड्रोजनच्या उत्पादनासाठी हरियाणातील जींद येथे इलेक्ट्रोलिसिस आधारित हायड्रोजन उत्पादन प्रकल्प उभारला जात आहे. रेल्वेसाठी ही एक महत्त्वाची पायाभूत सुविधा ठरणार आहे. स्वदेशी बनावटीच्या या ट्रेनमुळे ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेलाही चालना मिळाली आहे.

कशी असेल ट्रेन ?

रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितल्यानुसार, ही जगातील सर्वात लांब असलेल्या हायड्रोजन ट्रेनला १० डबे असेल. ही ट्रेन ब्रॉड गेजवर चालेल आणि ट्रेनमध्ये दोन ड्रायव्हिंग पॉवर कार अर्थात् डीपीसी असून, प्रत्येकाची क्षमता १२०० किलोवॅट, तर एकूण क्षमता २४०० किलोवॅट असेल. या ट्रेनमध्ये ८ प्रवासी डबे जोडण्यात आले आहेत. या ट्रेनचे एकमेव उत्सर्जन जलवाष्प असल्याने ती पूर्णपणे शून्य कार्बन उत्सर्जन तंत्रज्ञानावर आधारित राहील. हायड्रोजन ट्रॅक्शन हे नेक्स्ट जनरेशन फ्यूल तंत्रज्ञान असून, हा प्रकल्प भारतीय रेल्वेसाठी मोठा टप्पा ठरेल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---