पाच देशांच्या महासत्ता गटात भारत,डोनाल्ड ट्रम्प यांची योजना, शक्तिशाली देशांना एकत्र आणणार

---Advertisement---

 

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील शक्तिशाली देशांना एकत्र आणण्यासाठी कोर-५ अर्थातर महासत्ता गट तयार करण्याची योजना आखली असून त्यात भारताचा समावेश असेल. हा नवीन गट राहणार असून त्यात चीन, रशिया आणि जपान या देशांचादेखील समावेश राहणार आहे. जागतिक परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे आणि युरोपच्या प्रभावाला आव्हान म्हणून नवीन गट तयार करण्याची ट्रम्प यांची रणनीती आहे.

व्हाईट हाऊसने नुकत्याच प्रकाशित केलेल्या राट्रीय सुरक्षा धोरणावर आधारित अहवाल जारी केला. त्यात नवीन हार्ड-पॉवर ग्रुपची कल्पना उघड झाली आहे. कोर-५ (हार्ड-पॉवर ग्रुप) गटाचा त्यात उल्लेख आहे. त्यामध्ये अमेरिका, भारत, चीन, रशिया आणि जपान यांचा समावेश असेल. त्याचे मुख्य उद्दिष्ट प्रमुख शेींचा एक नवीन गट तयार करणे, विद्यमान युरोपाचे प्रभुत्व असलेल्या जी-७ आणि इतर पारंपरिक लोकशाही आणि संपत्ती-आधारित गटांच्या वर्चस्वावर मात करणे आहे. व्हाईट हाऊसच्या अहवालातील माहितीनुसार ट्रम्प यांनी पाच देशांचा महासत्ता गट तयार करण्याची योजना आखली. त्यात भारताचा प्रामुख्याने समावेश असेल. गटाची घोषणा करण्यापूर्वी ट्रम्प यांनी त्यात समावेश करण्यात येणाऱ्या देशांच्या प्रमुखांशी चर्चा सुरू केली आहे. २०२६ मध्ये नवीन जागतिक गटाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. युरोपीयन देशांचा समूह असलेल्या नाटो आणि इस्लामिक देशांच्या संघटनेचे वर्चस्व कमी करण्यासाठी, तसेच भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवीन गट काम करणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---