खरेदीची झुंबड! ‘HRS Aluglaze IPO’ला अभूतपूर्व प्रतिसाद, दोन दिवसात तीन पटीने वाढ

---Advertisement---

 

HRS Aluglaze IPO : ‘HRS Aluglaze IPO’ला गुंतवणूकदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, दोन दिवसात तब्बल तीन पटीने वाढ झाली आहे. दरम्यान, उभारलेला निधी हा अहमदाबादच्या प्लांटचा विस्तार आणि खेळत्या भांडवलासाठी वापरला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

वैयक्तिक गुंतवणूकदार २.७० पट, पात्र संस्थात्मक खरेदीदार १.०८ पट, तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा १.५१ पट प्रतिसाद मिळाला आहे. तसेच कंपनीच्या शेअर्सना ग्रे मार्केटमध्येही मोठी मागणी दिसून येत आहे. सध्या हा शेअर प्रति शेअर २० ते २५ रुपये प्रीमियमवर ट्रेड करत आहे, तर सौदा रेट १८००० ते २००० रुपयांदरम्यान आहे.

कंपनीने गुंतवणूक मर्यादा आखून दिली असून, वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी किमान गुंतवणूक २३०४०० रुपये (२४०० शेअर्स) आहे. या आयपीओचा लॉट साईज १२०० शेअर्सचा आहे.

दरम्यान, कंपनीने उभारलेल्या निधीचा वापर प्रामुख्याने विस्तार आणि कामकाजासाठी केला जाणार आहे. अर्थात अहमदाबादच्या राजोडा येथे फॅसाड कामासाठी, तर इतर रुपये हे खेळत्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी, तसेच सामान्य कॉर्पोरेट कामांसाठी वापरला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---