चांदीचा विक्रमी उच्चांक, सोन्याला टाकलं मागे; जाणून घ्या दर

---Advertisement---

 

जळगाव : जळगाव सुवर्ण बाजारपेठेत चांदीने आपली तेजी कायम राखत दोन लाखांचा टप्पा पार केला आहे. तर सोन्याच्या दरात कालच्या तुलनेत २५० रुपयांनी वाढली आहे.

चांदीच्या भावात एकाच दिवसात सात हजार रुपयांची वाढ झाली असून आता किलोभर चांदीसाठी दोन लाख दीड हजार रुपये मोजावे लागणार आहे. जीएसटीसह हीच किंमत दोन लाख सात हजार ५४५ रुपयांवर जाऊन पोहोचली आहे.

चांदीने एक लाख ते दोन लाख हा टप्पा केवळ १३ महिने आणि २५ दिवसांत गाठला आहे. २३ ऑक्टोबर २०२४ रोजी चांदीच्या भावाने एक लाखाचा टप्पा गाठला होता. सोन्याच्याही भावात चांदीच्या तुलनेत हळूहळू भाववाढ सुरूच आहे. बुधवारी ६०० रुपयांची वाढ होऊन सोने १० ग्रॅमसाठी एक लाख ३२ हजार ६०० रुपयांवर पोहोचले.

एक किलोचांदीसाठी सहा हजार ४५ रुपये केवळ ‘जीएसटी’ लागणार आहे. दरम्यान, वाढती मागणी व तुटवडा यामुळे चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. डिसेंबरच्या सुरूवातीला चांदीचा भाव एक लाख ७८ हजार रुपये होता. त्यात आता केवळ १७दिवसांतच तब्बल २३ हजार ५०० रुपयांनी वाढ झाली आहे.

सोन्याची किंमत किती ?

१८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम १०,११३ रुपये, २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम १२,३६० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम १३,४८४ रुपये आहे. कालच्या तुलनेत १० ग्रॅम १८ कॅरेट सोन्याची किंमत २५० रुपयांनी वाढली आहे.

२४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत आज ३३० रुपयांनी वाढून १,३४,८४० रुपयांवर पोहोचली आहे, जी काल १,३४,५१० रुपयांवरून वाढली आहे. त्याचप्रमाणे, २४ कॅरेट सोन्याच्या १०० ग्रॅमची किंमत बुधवारी ३,३०० रुपयांनी वाढून १३,४८,४०० रुपयांवर पोहोचली आहे, जी बुधवारी १३,४५,१०० रुपयांवरून वाढली आहे.

देशात आज २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत १,२३,६०० रुपयांवर पोहोचली आहे, जी काल १,२३,३०० रुपयांवरून वाढली आहे. त्याच वेळी, २२ कॅरेट सोन्याच्या १०० ग्रॅमची किंमत ३,००० रुपयांनी वाढून १२,३६,००० रुपयांवर पोहोचली आहे, जी काल १२,३३,००० रुपये होती.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---