महाविद्यालयात गेला अन् चार दिवसांनी मृतावस्थेत आढळला; नातेवाईकांना वेगळाच संशय…

---Advertisement---

 

जळगाव : जिल्ह्यात खुनाच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, या वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिक चिंतित आहेत. अशात पुन्हा एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, एका अल्पवयीन मुलीच्या नातेवाइकांनी धमकावल्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी किंवा त्याचा घातपात झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

हितेश सुनील पाटील (२०) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत भुसावळ येथे अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून, मयत हितेश पाटील याच्या वडिलांनी दिलेला जबाब भुसावळ शहर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात येणार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे यांनी सांगितले.

यावेळी बंदोबस्तासाठी निंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे, सावदा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश पाटील यांनी आंदोलकांची समजूत घातली.

नातेवाईकांचा ठिय्या

हितेश हा जळगाव येथील त्रिमूर्ती महाविद्यालयात शिकत होता. शनिवारी त्याच्याशी संपर्क झाला नाही. त्यानंतर दि. १४ रोजी सकाळी त्याची दुचाकी तापी पुलाजवळ आढळून आली. त्यानंतर दि. १७ रोजी त्याचा मृतदेह मिळून आला.

या प्रकरणी मयताच्या नातेवाईकांनी निंभोरा येथे पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. मृतदेहही पोलिस ठाण्यात आणला होता. घातपात झाल्याचा आरोप करत संबधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---