---Advertisement---
IPO Alert : गुंतवणूकदारांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. अर्थात दाचेपल्ली पब्लिशर्स लि.ने प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्याच्या ३९,६०,००० इक्विटी शेअर्स, ताज्या इश्यूसह आपला प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (IPO) सुरू करण्याची घोषणा केली आहे.
गुंतवणूकदारांसाठी शुक्रवारी ( दि.१९ डिसेंबर), तर सर्वसामान्यांसाठी सोमवारी (दि.२२ डिसेंबर) खुली होणार असून, बुधवारी (दि. २४ डिसेंबर) बंद होईल. हे इक्विटी शेअर्स बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे, ज्याची संभाव्य सूची ३० डिसेंबर, २०२५ आहे.
इश्यूचा प्रकार बुक बिल्ट इश्यू असा असून, किंमत बँड प्रति इक्विटी शेअर १०० ते १०२ रुपये, लॉट साईझ १२०० इक्विटी शेअर्स आणि त्याच्या पटीत असून या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर सिनफिन्क्स कॅपिटल प्रा.लि. हे आहेत. इश्यूचे रजिस्ट्रार बिगशेअर सर्व्हिसेस प्रा. लि. हे असून मार्केट मेकर जेएसके सिक्युरिटीज अँड सर्व्हिसेस प्रा.लि. हे आहेत.
एकूण ऑफरमध्ये ३९,६०,००० पर्यंत इक्विटी शेअर्सचा समावेश आहे, जे खालीलप्रमाणे वाटप केले जातील. पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIBs) ५० टक्केपेक्षा जास्त नाही. किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी १५ टक्के पेक्षा कमी नाही.
गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ३५ टक्केपेक्षा कमी नाही. क्यूआयबी भागापैकी ६० टक्के पर्यंत शेअर्स अँकर गुंतवणूकदारांना वाटप केले जाऊ शकतात. वाटपाचा आधार दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी निश्चित होण्याची अपेक्षा असून, त्यानंतर लवकरच शेअर्स गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे.
टीप : सदर माहिती केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहे. तरुण भारत याची पुष्टी करत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी तज्ज्ञांचा सल्ला घावा.









