Pratibha Chavan : निकालाआधीच विजय फिक्स; चाळीसगावमध्ये बॅनर्सही झळकले!

---Advertisement---

 

जळगाव : नगरपरिषद व पालिकांचा निवडणुकीचा निकाल आज, रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत स्पष्ट होणार असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता लागून आहे. कुठल्या पालिकेवर कुणाची सत्ता येते याबाबत अंदाज आणि आडाखे बांधले जात आहेत. दुसरीकडे चाळीसगावमध्ये प्रतिभा चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी विजय फिक्स असल्याचा दावा करत निकालाआधीच बॅनर्स झळकावले आहेत.

जिल्ह्यात 18 नगरपालिकांच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी 1 हजार 555 उमेदवार, तर नगराध्यक्ष पदासाठी 77 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, यापैकी एकूण 27 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष बिनविरोध झाले आहेत.

जिल्ह्यात एकूण 65.28 टक्के एवढे मतदान झाले असून 8 लाख 81 हजार 508 मतदारांपैकी 5 लाख 78 हजार 79 एवढ्या जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच जिल्ह्यात एकूण 1 हजार 590 एवढे टपाली मतपत्रिकाची संख्या असू,न त्यापासूनच मत मोजणीला सुरुवात होणार आहे.

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

भाजपचे मंत्री गिरीश महाजन, शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यासह नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. दरम्यान, मतमोजणीला सुरुवात झाली असून, दुपारी १ वाजेपर्यंत उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे.

चाळीसगावमध्ये बॅनर्सही झळकले!

चाळीसगाव नगर परिषद निवडणुकीत भाजपाविरुद्ध शरद पवार राष्ट्रवादी व ठाकरे गट शिवसेना यांची आघाडीत मोठी लढत होती. मात्र मतमोजणीच्या अगोदरच प्रतिभा चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी विजय फिक्स असल्याचा दावा करत निकालाआधीच बॅनर्स झळकावले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---