भारत न्यूझिलंडदरम्यान मुक्त व्यापार करार : पीयूष गोयल

---Advertisement---

 

नवी दिल्ली : भारत आणि न्यूझिलंड यांच्यात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे (एफटीए) भारतातून होणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या निर्यातीवर शून्य टक्के आयात कर लागणार असल्यामुळे याचा फायदा भारतातील शेतक-यांसह विविध क्षेत्रातील उद्योगांना होणार असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज सांगितले.

वाणिज्य आणि उद्योग भवनात आयोजित पत्रपरिषदेत गोयल म्हणाले की, न्यूझिलंडने येत्या १५ वर्षात भारतात २० अब्ज डॉलर गुंतवणुकीचे आश्वासन दिले आहे. ही गुंतवणूक निर्मिती, पायाभूत सुविधा आणि सेवा क्षेत्रात वात होणार आहे.

भारतातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी न्यूझिलंडसोबत झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे फळे, भाजी, कॉफी, मसाले, धान्य आणि प्रक्रिया केलेले पदार्थ यांना न्यूझिलंडची मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच न्यूझिलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्यात आज झालेल्या दूरध्वनीवरील चर्चेनंतर दोन देशातील या व्यापार कराराला आज अंतिम रुप देण्यात आले.

मी आणि न्यूझिलंडचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री टॉड मॅक्ले यांच्यात हा करार नऊ महिन्याच्या प्रदीर्घ चर्चेनंतर प्रत्यक्षात आला, असे स्पष्ट करत गोयल म्हणाले की, दोन देशातील द्विपक्षीय संबंध वृध्दिंगत करण्याच्या दिशेने झालेली ही मोठी उपलब्धी म्हटली पाहिजे. या व्यापार करारामुळे न्यूझिलंडने ५ हजार व्यावसायिकांना अस्थायी रोजगार प्रवेश व्हिसा तसेच १ हजार वर्क आणि हॉलिडे व्हिसा द्यायची तयारी दर्शवली आहे, असे ते म्हणाले.

या व्यापार करारामुळे भारतातून न्यूझिलंडमध्ये निर्यात होणाऱ्या १०० टक्के उत्पादनांना शून्य टक्के टेरिफचा फायदा मिळणार आहे, तर न्यूझिलंडमदुन भारतात आयात होणाऱ्या ९५ टक्के व्यापारी उत्पादनांना या कराराचा फायदा मिळणार आहे.

कृषी, वस्त्रोद्योग क्षेत्राला फायदा

मार्च महिन्यात न्यूझिलंडसोबत द्विपक्षीय चर्चेला सुरुवात झाली आणि ९ महिन्यांच्या काळात या चर्चेला अंतिम रुप देण्यात यश आले, याकडे लक्ष वेधत गोयल म्हणाले की, या करारामुळे भारतातून न्यूझिलंडमध्ये निर्यात होणाऱ्या कृषी, कपडा, औषधी, चामडे तसेच अभियांत्रिकी क्षेत्राला मोठा फायदा मिळणार आहे. याआधी भारताचा ब्रिटन आणि ओमान या दोन देशांशी व्यापक व्यापार करार झाला आहे. त्यानंतर भारताचा असा करार होणार न्यूझिलंड हा तिसरा देश ठरला आहे. असे गोयल म्हणाले.

आयुष चिकित्सक-योग प्रशिक्षकांना फायदा

यामध्ये आयुष चिकित्सक, योग प्रशिक्षक, भारतीय शेफ आणि संगीत शिक्षक यासारक्या भारतीय व्यवसायांचा तसेच माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, आरोग्यसेवा, शिक्षण आणि बांधकाम यासारख्या मोठी मागणी असलेल्या क्षेत्रांचा समावेश आहे. यामुळे मनुष्यबळाची गतिशीलता आणि सेवा व्यापाराला बळकटी मिळेल, असे त्यात म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---