---Advertisement---
धुळे : भांडी विक्रीच्या दुकानात मध्यरात्री झालेली घरफोडीची घटना उघडकीस येताच आझादनगर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या १२ तासांत सराईत गुन्हेगाराला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या रकमेपैकी ७० हजार ७०० रुपये जप्त केले आहेत.
गल्ली नंबर ४मधील शनी मंदिरसमोर सुरेश जैन (६०) यांच्या मालकीचे ‘शा. रमणलाल पुनमचंद जैन’ नावाचे भांडी विक्रीचे दुकान आहे. १७ डिसेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा ते सकाळी साडेसातच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला.
याप्रकरणी सुरेश जैन यांच्या फिर्यादीवरून आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून पाहणी केली. त्यात एका संशयिताची हालचाल कैद झाली होती.
पोलिसांनी बारकाईने तपास केला असता, तो संशयित धुळ्यातील सराईत गुन्हेगार सद्दाम उर्फ बोबड्या दादा रशीद शेख यास जेरबंद केले असून, त्याच्याकडून चोरीच्या रकमेपैकी ७० हजार ७०० रुपये जप्त केले आहेत.









