---Advertisement---
Ravindra Chavan : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश मिळविल्यानंतर नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकांमध्ये डोळे दिपवणारे यश प्राप्त करीत भारतीय जनता पार्टी सर्वांत मोठा पक्ष आणि राजकारणातील ‘धुरंधर’ ठरला आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी यंदाच्या निवडणुकीत प्रचारगीतातून गाजलेले “तुमची आमची भाजपा सर्वांची” हे बोल जनतेने खरे करून दाखवले, हे या निकालावरून सिद्ध झाल्याचे मत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकांमध्ये शिवसेना दुसऱ्या तर राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर राहिले. महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसने कसाबसा दुहेरी आकडा गाठला पण उबाठा आणि शरद पवार गटाला तर दारुण पराभवाचा सामना करावा लागला. बहुतांश ठिकाणी सर्वच पक्ष स्वतंत्र लढले. विशेषतः या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सर्वांत मोठा पक्ष आणि राजकारणातील ‘धुरंधर’ ठरला आहे.
चव्हाणांनी सहा महिन्यांपूर्वी हाती घेतली प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सहा महिन्यांपूर्वी या पदाची धुरा हाती घेतली. नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकांमध्ये त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. दरम्यान, अनेक दिग्गज नेते त्यांनी भाजपात आणले. विशेषतः या निवडणुकीत चव्हाण हे पैकीच्या पैकी गुणांनी उत्तीर्ण झाल्याचे स्पष्ट झाले.
महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचं गणित सोडविले…
राज्यात सत्तास्थानाला वा महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचे अचूक गणित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यसह प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोडविले. तसेच श्रीकांत शिंदे यांच्याशी असलेले रविंद्र चव्हाण यांचे प्रेम व तिरस्कार असे दुहेरी संबंध गेल्या काही दिवसांतील भाजपा पक्ष प्रवेशामुळे अधिक गहिरे होतील का?, अशी शक्यता या निकालांमुळे झाली आहे.
महापालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र-रविंद्र यांची किमया चालणार?
दरम्यान, महापालिकेचा बिगुल वाजला असून, या निवडणुकांमध्येही देवेंद्र-रविंद्र यांची किमया चालेल, अशीच शक्यता आहे. मात्र महायुतीतील सहकारी पक्ष आता कशी व्यूहरचना करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.









