---Advertisement---
जळगाव : विवाहिता सासरी असताना तिच्या माहेरी तलाकची नोटीस पाठविल्याने विवाहितेने फिनाइल प्राशन केले. हा प्रकार २२ डिसेंबर रोजी मास्टर कॉलनीमध्ये घडला. याप्रकरणी पती, सासू, सासरे, नणंदेविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तिच्या पतीने भुसावळ येथे माहेरी तलाकची नोटीस पाठविल्याचे तिला तिच्या आईने फोन करून कळविले. त्याविषयी तिने आपण नांदण्यास तयार असताना तलाकची नोटीस का पाठविली, असे सासूला विचारले.
त्यावर माझ्या मुलाने लग्न केले आहे, तू माहेरी निघून जा, असे सासूने सांगितले. त्यामुळे विवाहितेने फिनाइल प्राशन केले. तिला सासूने रोखले असता अर्धे फिनायल विवाहितेच्या अंगावर सांडले. विवाहितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
याप्रकरणी विवाहितेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पती आकीब शेख जहीर, सासरे जियाउद्दीन शेख, सासू वैदा नाज शेख व नणंद या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक हेमंत जाधव करीत आहेत.









