---Advertisement---
Pachora News : तालुक्यातील अंतुर्ली बुद्रुक येथील तरुण शेतकरी अजय सुरेश पाटील हे त्यांच्या गुरांना चारा पाणी देण्यासाठी वाड्यात गेले असता, तेथे विषारी सर्पदंशाने मृत्यू ओढवला.
अंतुर्ली बुद्रुक येथील तरुण शेतकरी अजय सुरेश पाटील हे नेहमी प्रमाणे त्यांच्या गावाशेजारील वाड्यात गुरांना सकाळी साडे दहाच्या सुमारास चारा पाणी देण्यासाठी गेले होते. तेथून येणाऱ्या जाणाऱ्यांना अजय पाटिल हे बेशुद्धावस्थेत दिसले. त्यांनी हे दृश्य पहाताच आरडा-ओरड करीत बेशुद्ध असलेल्या अजय पाटिल यांना महेश पंडित पाटील यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता विषारी सापाने दंश केले असल्याचे आढळुन आल्याने त्यास मृत घोषित केले.
यासंदर्भात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यबकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक हटकर करीत आहेत.









