बिनशेती प्लॉट फेरफार नोंदीसाठी लाच घेताना तलाठी सापळ्यात !जामनेरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

---Advertisement---

 

Jamner News : जामनेर सजाचा तलाठी वसीम राजू तडवी याने प्लॉटची खरेदी नोंद फेरफार प्रकरणी तक्रारदाराकडे ५हजार रुपयांची लाचेची मागणी केली. याप्रकरणी लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लावलेल्या सापळ्ळ्यात तलाठी तडवी यास तडजोडीअंती चार हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली.

तक्रारदार हे जामनेर येथील रहिवासी असून तक्रारदारांनी १६ डिसेंबर २०२५ रोजी जामनेर येथे दोन बिनशेती प्लॉट कायम खरेदी केले आहे. संबंधित प्लॉटची खरेदी केल्यानंतर तक्रारदार व त्यांच्या पत्नीचे फेरफार नोंद करून त्यांचे नाव अधिकार अभिलेखात तसेच ७/१२ उताऱ्यावर दाखल करण्यासाठी जामनेर सजाचे तलाठी वसीम राजू तडवी यांनी तक्रारदाराकडे पाच हजारांच्या लाचेची मागणी केली.

यासंदर्भात तक्रारदारांनी बुधवारी (७जानेवारी) जामनेरचे तलाठी वसीम राजू तडवी यांच्याविरुद्ध जळगाव येथील येथील लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात समक्ष तक्रार दिली होती. तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीची बुधवारी (७ जानेवारी) पडताळणी केली असता, तलाठी वसीम तडवी यांनी तक्रारदार व त्यांच्या प्रतिबंधक पत्नीच्या नावे घेतलेल्या प्लॉटची फ रफार नोंद करून त्यांची नावे अधिकार अभिलेखात तसेच ७/१२ उताऱ्यावर दाखल करून देण्याच्या मोबदल्यात पंच साक्षीदारांसमक्ष पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. तसेच तडजोडीअंती चार हजार रुपये लाच म्हणुन स्वीकारण्याचे मान्य केले.

त्यानंतर बुधवारी (७जानेवारी) तक्रारदारांकडून यातील तलाठी वसीम तडवी यांनी लाचेपोटी चार हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पंचासमक्ष अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनात पर्यवेक्षण अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस नाईक बाळू मराठे, पोलीस शिपाई भूषण पाटील यांनी केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---