प्रवाशांनो लक्ष द्या ! जळगावहून मुंबई आणि अहमदाबादकडे जाणाऱ्या विमानाच्या वेळापत्रकात बदल

---Advertisement---

 

जळगाव विमानतळावरून मुंबई आणि अहमदाबादकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जळगाव–मुंबई–अहमदाबाद या विमानसेवांच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला असून, हा बदल ३१ जानेवारीपर्यंत लागू राहणार आहे.

सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी मुंबईहून जळगावकडे येणारे विमान सायंकाळी ५:४५ वाजता मुंबईतून उड्डाण करून ७:०५ वाजता जळगावला पोहोचेल. त्यानंतर हेच विमान जळगावहून सायंकाळी ७:३० वाजता रवाना होऊन रात्री ८:४५ वाजता अहमदाबादला दाखल होईल.

मात्र रविवारी या सेवेत बदल करण्यात आला आहे. त्या दिवशी मुंबईहून सायंकाळी ७ वाजता जळगावला येणारे विमान अहमदाबादकडे न जाता, सायंकाळी ७:३० वाजता थेट मुंबईला परत जाणार आहे.

तसेच मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी अहमदाबादहून जळगावकडे येणारे विमान सायंकाळी ५:४५ वाजता अहमदाबादहून उड्डाण करून ७ वाजता जळगावला पोहोचेल. पुढे हेच विमान जळगावहून ७:२५ वाजता निघून रात्री ८:४५ वाजता मुंबईला पोहोचेल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---