शेतातील रस्त्याच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण, ससदे गावातील घटना

---Advertisement---

 

शहादा तालुक्यातील ससदे गावात शेतातून रस्ता बनवण्याच्या कारणावरून झालेल्या वादात तरुणाला कुदळीने मारहाण करून पाय फ्रैक्चर केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिमन दौलत शिंदे (रा. ससदे) हे २७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास शेतातून घरी परतत असताना हा प्रकार घडला. शिंदे यांच्या शेतातून रस्ता बनवण्याच्या कारणावरून संशयितांनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्या वेळी शिंदे यांचा मुलगा भाऊसाहेब शिंदे हा तेथे आला आणि त्याने संशयितांना विचारणा केली. याचा राग आल्याने संशयितांनी त्याला जमिनीवर पाडले. संशयित संदीप नामदेव शिंदे याने कुदळीने भाऊसाहेबच्या डाव्या पायावर जोरात प्रहार केला, ज्यामध्ये त्याचा पाय गुडघ्यातून फॅक्चर झाला आहे.

या हल्ल्यानंतर संशयितांनी शिंदेंच्या मुलाला अभिमन लाथाबुक्क्यांनी मारहाण करत अश्लील शिवीगाळ केली आणि ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी ६ जानेवारीला सारंगखेडा पोलीस ठाण्यात किरण आधार शिंदे, संदीप नामदेव शिंदे व हेमराज नामदेव शिंदे (सर्व रा. ससदे, ता. शहादा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सारंगखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक निरीक्षक रवींद्र बागूल यांच्या मार्गदर्शनात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक फौजदार प्रकाश हिरालाल चौधरी तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---