देशाच्या शत्रूंवर अजित डोभालांचा हल्लाबोल, म्हणाले…

---Advertisement---

 

‘विकसित भारत – युवा नेत्यांचा संवाद’ या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देशाच्या इतिहासावर आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या आव्हानांवर भाष्य केलं. भारत आज जितका स्वतंत्र आणि सक्षम दिसतो, तितका तो नेहमीच नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.

डोवाल म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या पूर्वजांनी त्याग केला. त्यांनी अपमान, अत्याचार आणि असहाय्यतेचा सामना केला. अनेकांना फाशी देण्यात आली, गावे जाळण्यात आली, संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न झाले आणि मंदिरे लुटली गेली. या सगळ्या घटनांचा आपण अनुभव घेतला, असं ते म्हणाले

अजित डोवाल पुढे म्हणाले, “हा इतिहास आजच्या तरुणांना आव्हान देतो. भारतातील प्रत्येक तरुणाच्या मनात बदलाची आग पेटलेली असली पाहिजे. ‘सूड’ हा शब्द आदर्श नसला, तरी तो एक प्रभावी शक्ती आहे. आपल्या इतिहासातील अन्यायांचा सूड म्हणजे भारताला पुन्हा त्याच्या वैभवाच्या शिखरावर नेणे होय. आपल्या हक्कांवर, विचारांवर आणि श्रद्धांवर आधारित एक महान भारत उभारणे हेच आपले ध्येय असले पाहिजे.”

इतिहासाचे धडे विसरू नका – अजित डोवाल

भारताच्या सांस्कृतिक परंपरेवर प्रकाश टाकत अजित डोवाल म्हणाले कि “आपली संस्कृती अत्यंत प्रगत होती. आम्ही कधीही इतरांच्या धार्मिक स्थळांवर आक्रमण केले नाही किंवा लुटालूट केली नाही. जेव्हा जग मागासलेले होते, तेव्हा भारताने कोणत्याही देशावर आक्रमण केले नाही. मात्र, आपल्या सुरक्षेच्या बाबतीत उदासीन राहिल्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागले,” असे ते म्हणाले.

इतिहासाने आपल्याला वारंवार धडे दिले आहेत. मात्र, भविष्यातील पिढ्या हे धडे विसरले, तर ती भारतासाठी सर्वात मोठी शोकांतिका ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला.

आम्ही युद्धे का लढतो?

युद्धाच्या संकल्पनेबाबत बोलताना अजित डोवाल म्हणाले, “युद्धे करमणुकीसाठी किंवा हिंसेचा आनंद घेण्यासाठी लढली जात नाहीत. आम्ही मनोरुग्ण नाही. युद्धे शत्रूचे मनोबल खच्ची करण्यासाठी लढली जातात, जेणेकरून तो आमच्या इच्छेला शरण जाईल आणि आमच्या अटी स्वीकारेल. मजबूत इच्छाशक्ती हीच पुढे राष्ट्रीय शक्ती बनते.”

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---