ई-केवायसीअभावी ३१ टक्के शेतकरी अनुदानापासून वंचित!

---Advertisement---

 

जळगाव : मान्सून काळात जून ते सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात अतीवृष्टी, पूरस्थितीमुळे ग्रामीण भागात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीचे बऱ्याच ठिकाणी शासन निर्देशानुसार सरसकट पंचनामे होवून जिल्हाप्रशासनाकडून तब्बल २ लाख ७० हजार ९२६.४७हेक्टर क्षेत्रावरील ३ लाख ५५ हजार ४८७ शेतकऱ्यांच्या शेतपिकांच्या नुकसानीचा अहवाल पाठविणयात आला होता. त्यानुसार शासनाने अतीवृष्टी नुकसान मदत जाहिर करीत शेतकऱ्यांना दिलासा दिला. परंतु सप्टेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान शासन मदत अनुदानापैकी अद्यापही ३१ टक्के शेतकरी ई-केवायसीअभावी किंवा ईकेवायसी करूनही अतिवृष्टी मदत अनुदानापासून वंचित असल्याचेच दिसून येत आहे.

जून ते सप्टेंबर मान्सून काळात जिल्ह्यात १३ तालुक्यात अतीवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतजमीनीवरील हाती आलेले खरीप पिकांचे तसेच पुरामुळे शेतजमीनी खरवडून गेल्याने अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे सरसकट पंचनामे शासन आदेशानुसार जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाकडून तातडीने करण्यात आले आहेत. यात शासनस्तरावरून अतीवृष्टी पूरस्थितीमुळे शेतपिकांच्या नुकसान अनुदानापोटी २ लाख ७० हजार ९२६.४७ हेक्टर क्षेत्रावरील ३ लाख ५५ हजार ४८७ बाधीत शेतकऱ्यांना २७० कोटी ९२ लाख ६४ हजार ७०० रूपये निधी मंजूर करण्यात आला.

स्थानिक पातळीवर ईकेवायसी प्रलंबित असल्याच्या सूचना

आतापर्यत १८७ कोटी ५६ लाख ८१ हजार ५४४ रूपये निधीचे २ लाख ७१ हजार २२९ अतीवृष्टी नुकसान बाधीत शेतकऱ्यांना जिल्हा लॉगींगवरून मान्यता देण्यात आली आहे. १८७ कोटी ४३ लाख ८ हजार ७४३ रूपये निधीचे २ लाख ७१ हजार २७ शेतकऱ्यांना डिबीटी व्दारे संबंधीत बँक खात्यात अतीवृष्टी नुकसान अनुदान वितरीत झाले आहे.
असे असले तरी आतापर्यत बहुतांश तालुक्यात बाधीत शेतकऱ्यांना अतीवृष्टी नुकसान अनुदान ईकवायसी अभावी प्रलंबित असल्याच्या सूचना स्थानिक पोलीस पाटील ग्राम सचीवांकडून नोव्हेंबर, डिसेंबर २०२५ महिन्यात देण्यात आल्या होत्या. त्यानुसार बऱ्याच शेतकऱ्यांनी तालुकास्तरावर तसेच स्थानिक पातळीवर आपले सरकार केंद्रावर जाऊन ईकेवायसी केले आहे.

ईकेवायसी करूनही दोन टक्के पात्र शेतकऱ्यांना लाभ

यातील बहुतांश शेतकऱ्यांनी ईकेवायसी केले असून संबंधीत प्रशासन अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना ई केवायसी केल्याचे पुरावे झेरॉक्स कागदपत्र दिली आहेत. भडगाव तालुक्यात एका गावातील सुमारे २५० शेतकऱ्यांची यादी स्थानिक पातळीवर देण्यात आली असून त्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केले आहे. यातील केवळ १५ ते २० शेतकऱ्यांचेच अनुदान रकम मिळाले असून अन्य २३० शेतकरी अतीवृष्टी व रब्बी मदत अनुदानापासून वंचीत असल्याचे दिसून येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---