---Advertisement---
जळगाव : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. जळगाव महापालिकेत सकाळी मतदानाचा वेग मंद असला, तरी उशिरा तो हळूहळू वाढताना दिसून आला. सकाळी ११.३० वाजेपर्यंत शहरात एकूण १३.४ टक्के मतदान झाले आहे.
जळगाव महापालिकेच्या एकूण ७५ जागांपैकी १२ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले असून उर्वरित ६३ जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदान केंद्रांवर मतदारांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली. मात्र, सकाळी ९.३० वाजेपर्यंत केवळ ५.५ टक्के मतदानाची नोंद झाली होती.
पहिल्या दोन तासांत मतदारांचा प्रतिसाद अपेक्षेप्रमाणे दिसलेला नसला तरी त्यानंतर मतदानाचा टक्का वाढताना दिसून आला. दुपारच्या वेळेत मतदारांचा सहभाग अधिक वाढण्याची शक्यता असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.









