जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाची प्रत्येक अपडेट एका क्लीक वर

---Advertisement---

 

जळगाव महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून आतापर्यंतच्या फेऱ्यांमध्ये निकालानंतर महायुतीचाच बोलबाला पाहायला मिळत आहे आतापर्यंत महायुतीमध्ये भाजपचे 21 शिवसेना शिंदे गटाचे 12 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एका उमेदवार विजयी झालेले आहे.

कारागृहातून निवडणूक लढवणारे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार ललित कोल्हे विजयी

प्रभाग क्रमांक ४ ड मधून शिवसेना शिंदे गटाचे पियुष ललित कोल्हे विजयी

प्रभाग ५ मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विष्णू भंगाळे यांच्यासह मंगला चौधरी, आशा पाटील आणि नितीन लढ्ढा विजयी

प्रभाग ७ मधून भाजपचे उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे विजयी

प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपचे उमेदवार सुरेश सोनवणे, माधुरी अतुल बारी, कविता भोई, जाकीर खान आघाडीवर

प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजपच्या उमेदवार जयश्री राहुल पाटील विजयी

प्रभाग १५ महायुती सर्व विजयी

प्रभाग १५ मधील महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले असून यामध्ये अरविंद देशमुख (भाजपा), चेतन शिरसाळे (भाजपा), काळे रेशमा कुंदन (शिवसेना) प्रकाश रावलमल बालानी (भाजपा) यांचा समावेश आहे

प्रभाग क्रमांक 16 मधून भाजपच्या उमेदवार रंजना वानखेडे विजयी

प्रभाग क्रमांक 11 मधून शिंदे सेनेचे चारही उमेदवार विजयी झाले असून त्यात डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे, संतोष मोतीराम पाटील, सिंधूताई कोल्हे, ललित कोल्हे विजयी

जळगाव आतापर्यंत भाजपला 42 जागा तर शिवसेनेला 17 जागा जळगाव महापालिकेत महायुतीचाच बोलबाला पाहायला मिळत आहे.

प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपच्या उमेदवार प्रतीक्षा कैलास सोनवणे विजयी तर तर अपक्ष उमेदवार चैताली ठाकरे पराभूत

प्रभाग ८ ‘अ’ मधून भाजपच्या कविता पाटील विजयी

प्रभाग क्रमांक 8 आणि 10 मध्ये फेर मतमोजणी साठी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिला अर्ज

प्रभाग क्रमांक 17 मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रशांत नाईक, इकबालुद्दीन पीरजादे, सुमय्या पटेल, हिना पिंजारी चारही उमेदवार पराभूत

जळगाव महापालिकेत महायुतीची बहुमताकडे निर्णायक वाटचाल

जळगाव मध्ये अपक्ष उमेदवारांनी उघडत प्रभाग क्रमांक 1 मध्ये अपक्ष उमेदवार भारती सोनवणे विजयी

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---