---Advertisement---
सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य प्रवाशांची गर्दी होत आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. आणि यामुळे प्रवाशांचे वाढती गर्दी पाहता मध्य रेल्वेने विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला असून दोन मार्गावर अनारक्षित विशेष रेल्वे या धावणार आहेत.
विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वसामान्य प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी म्हणजे आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर विदर्भ, खानदेश व पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱ्या रेल्वे मार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता., भुसावळ ते मिरज आणि अमरावती ते पनवेल दरम्यान अनारक्षित विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय हा रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळणार असून सर्व उत्सव आणि सुट्ट्यांच्या काळामध्ये ही विशेष रेल्वे सेवा अमरावती, अकोला, जळगाव, नाशिक, पुणे जिल्ह्यातील प्रवाशांना उपयुक्त ठरणार आहे.
1. भुसावळ-मिरज (०१२०९) क्रमांकाची विशेष गाडी २३ जानेवारीला सायंकाळी ४.५० वाजता भुसावळ येथून सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ८.५० वाजता मिरज येथे पोहोचेल. परतीची ०१२१० क्रमांकाची गाडी २६ जानेवारी रोजी मिरज येथून सायंकाळी ७ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता भुसावळ येथे पोहोचेल.
भुसावळ-मिरज आणि मिरज-भुसावळ या गाडीला अप आणि डाऊन मार्गावर जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी आणि सांगली येथे थांबे असतील.
2. अमरावती-पनवेल (०१४१६) हि विशेष गाडी २२ जानेवारीला अमरावती येथून दुपारी १२ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता पनवेल येथे पोहोचेल. तर पनवेल-अमरावती (०१४१५) क्रमांकाची परतीची गाडी २६ जानेवारीला पनवेल येथून रात्री ७.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता अमरावती येथे पोहोचेल.
अमरावती-पनवेल आणि पनवेल-अमरावती या गाडीला अप व डाऊन मार्गावर बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, लोणावळा आणि कर्जत येथे थांबे देण्यात आले आहेत.









