---Advertisement---
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची बिनविरोध निवड झाली आली आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. यामुळे पक्षाच्या नेतृत्वात नवे पर्व सुरू झाले असल्याचे चित्र आहे.
याआधी १४ डिसेंबर २०१५ रोजी नितीन नबीन यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता ४५ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली असून, भाजपच्या इतिहासात सर्वात कमी वयात हे पद भूषवणारे ते पहिले नेते ठरले आहेत. ते भाजपचे १२ वे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
त्यांच्या निवडीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, ज्येष्ठ नेते नितीन गडकरी तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी त्यांचे अभिनंदन केले. नबीन यांची निवड कोणत्याही विरोधाविना झाल्याने पक्षातील विविध घटकांमध्ये एकसंघतेचे वातावरण असल्याचे दिसून येते.
नितीन नबीन यांच्या नेतृत्वाखाली भाजप आगामी निवडणुकांसाठी अधिक संघटित आणि प्रभावी पद्धतीने तयारी करेल, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. त्यांच्या तुलनेने तरुण वयामुळे नव्या कल्पना, युवकांना संधी आणि आधुनिक राजकीय रणनीती यांना प्राधान्य मिळेल, अशी अपेक्षा आहे. तसेच, त्यांच्या अनुभवाचा आणि धोरणात्मक दृष्टिकोनाचा पक्षाला भविष्यातील आव्हानांना सामोरे जाताना निश्चितच फायदा होईल, असेही मानले जात आहे.









