---Advertisement---
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. बँकेने विविध पदांसाठी भरतीची अधिकृत अधिसूचना जाहीर केली असून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २० जानेवारीपासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार ३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज करू शकतात.
या भरती मोहिमेअंतर्गत एकूण ३५० पदे भरली जाणार आहेत. यामध्ये ५० पदे फॉरेन एक्सचेंज ऑफिसरसाठी तर ३०० पदे मार्केटिंग ऑफिसरसाठी राखीव आहेत. एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि खुल्या प्रवर्गासाठी पदे राखीव असून अपंग उमेदवारांसाठीही आरक्षण देण्यात आले आहे.
फॉरेन एक्सचेंज ऑफिसर पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेची पदवी आवश्यक आहे. तसेच सीएफए, सीए किंवा एमबीए असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. या पदासाठी परकीय चलन व्यवहाराचे प्रमाणपत्र आणि किमान पाच वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
तर मार्केटिंग ऑफिसर पदासाठी एमबीए किंवा पीजीडीबीएम पदव्युत्तर पदवी आणि किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, अनुभव आणि मुलाखतीवर आधारित असेल. लेखी परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी बोलावले जाईल.
अधिक माहिती आणि ऑनलाईन अर्जासाठी उमेदवारांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://centralbank.bank.in/en/recruitment येथे भेट द्यावी.









