राज्यातील महापालिकांच्या सत्ता स्थापनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात; महापौर उपमहापौर पदाचा निवड कार्यक्रम शासनाकडून जाहीर….

---Advertisement---

 

राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये आता सत्तास्थापनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. महापौर आणि उपमहापौर निवडीसाठीचा सविस्तर कार्यक्रम राज्य शासनाने जाहीर केला आहे.

महापौर, उपमहापौर पदाच्या निवड कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील सर्व महानगरपालिकांची निवड प्रक्रिया कशी असणार, पाहुयात….

२२ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व महानगरपालिकांचं महापौर पदाचा आरक्षण सोडत…

२३ जानेवारी २०२६ रोजी आरक्षण जाहीर झाल्यानंतर नगरसचिवांची महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक घेण्याकरिता निर्वाचित सदस्यांचे प्रथम बैठक बोलवण्यासाठी तारीख व वेळ निश्चितसाठी संबंधित विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा. (बृहन्मुंबई महानगरपालिका वगळून)

२४ जानेवारी ते २५ जानेवारी २०२६ रोजी विभागीय आयुक्तांकडून महानगरपालिकांच्या पहिल्या सभेची तारीख व पीठासीन अधिकारी निश्चित करण्यात येणार आहेत. या सभांची सूचना स्थानिक वर्तमानपत्रांत प्रसिद्ध केली जाणार आहे.

२७ आणि २८ जानेवारी २०२६ रोजी महापौर व उपमहापौर पदासाठी इच्छुक नगरसेवकांकडून नामनिर्देशन अर्ज दाखल केले जातील.

३० जानेवारी आणि ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत नवनिर्वाचित सदस्यांची विशेष बैठक घेऊन महापौर आणि उपमहापौरांची निवड करण्यात येणार आहे.

(या निवड प्रक्रियेमुळे राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये नवी सत्ता रचना स्पष्ट होणार) राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---