पाळधीत घरफोड्यांची मालिका ; एक रात्र, तीन घरफोड्या.. परिसरात भीतीच वातावरण…!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यात घरफोड्यांच्या आणि चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून चोरट्यांनी नागरिकांची झोप उडवली आहे. धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

शुक्रवारी मध्यरात्री पाळधीतील गोविंदनगर आणि साईबाबा मंदिर परिसरात चोरट्यांनी डाव साधला. गोविंदनगर येथील रिक्षाचालक अरमान सय्यद यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातील सुमारे ६ तोळे सोनं आणि २५ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली.

तर साईबाबा मंदिराजवळील रमेश कुंभार यांच्या घरातून तब्बल १ लाख रुपये रोख, ५ ग्रॅम सोनं आणि १५ भार चांदी लंपास करण्यात आली. याच परिसरातील राठोड यांच्या घरातूनही १० हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली आहे.

गोविंदनगर येथील घरफोडीची माहिती सकाळी उघडकीस आली, तर साईबाबामी मंदिर परिसरातील चोरी दुपारी दोन वाजेच्या सुमारास समजली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन डॉग स्कॉड व स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने पाहणी केली.

चोपडा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप, धरणगाव पोलिस स्टेशनचे निरीक्षक सुनील पवार आणि पाळधीचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कंडारे यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांना खबरदारीच्या सूचना केल्या.

या प्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाळधी पोलिस दत्तात्रय बडगुजर करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---