घरात मुलाचं लग्न…..आई १६ वर्षांनी लहान भाच्यासोबत पळाली….मामी-भाच्याचा प्रेमप्रकरणाची अनोखी कहाणी….!

---Advertisement---

 

उत्तर प्रदेशातील अलिगढ जिल्ह्यातील पाली मुकीमपुर परिसरातील बीसनपुर गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात मुलाच्या लग्नाची लगबग सुरू असतानाच तीन मुलांची आई असलेली महिला तिच्याच १६ वर्षांनी लहान भाच्यासोबत फरार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे ती घरात लग्नासाठी साठवून ठेवलेली रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने घेऊन निघून गेल्याचा आरोप आहे.

पीडित पतीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलाचे लग्न ६ मार्च २०२६ रोजी ठरले होते. घरात आनंदाचे वातावरण होते. नातेवाईकांना निमंत्रणे दिली जात होती आणि लग्नाची तयारी जोरात सुरू होती. मात्र २५ जानेवारी रोजी पत्नी माहेरी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली आणि परतलीच नाही. काही दिवसांनी समजले की ती तिच्या भाचा विक्रमसोबत निघून गेली आहे.

पतीचा आरोप आहे की विक्रमने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पत्नीला सोबत नेले. तसेच घरातील एक लाख रुपयांची रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने घेऊन गेल्याचेही त्यांनी सांगितले. या दागिन्यांमध्ये मंगळसूत्र, सोन्याची चैन, अंगठी आणि पैजण यांचा समावेश आहे. “हे सर्व पैसे आणि दागिने आम्ही मुलाच्या लग्नासाठी पै-पै जमवले होते. आता लग्नाचे काय होणार?” असा सवाल पतीने उपस्थित केला आहे.

घटनेनंतर पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपी भाचा विक्रम आणि इतर नऊ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी नीरज जादोन यांची भेट घेऊन पीडित पतीने न्यायाची मागणी केली आहे. “साहेब, बायकोला शोधून काढा, नाहीतर मुलाचे लग्न होणार नाही. आमचे कुटुंब समाजात थट्टेचा विषय बनले आहे,” असे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितल्याचे समजते.

या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे आरोपी विक्रम हा संबंधित महिलेपेक्षा १६ वर्षांनी लहान आहे. वयातील मोठे अंतर असूनही दोघांमध्ये संबंध असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. पोलिस सध्या या घटनेकडे प्रेमसंबंध आणि कारस्थान अशा दोन्ही अँगलने तपास करत आहेत. विविध संभाव्य ठिकाणी छापेमारी करण्यात येत असली तरी अद्याप दोघांचा ठावठिकाणा लागलेला नाही.

एक महिना उलटूनही आरोपींचा शोध लागलेला नसल्याने कुटुंब चिंतेत आहे. मुलाच्या लग्नाचे भवितव्य अधांतरी आहे. समाजात चर्चेचा विषय ठरलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपासावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---