‘समृद्धी’ महामार्गावर ट्रकची पिकअप व्हॅनला धडक, सात महिलांचा मृत्यू

---Advertisement---

 

जालना : ट्रकने समृद्धी महार्गावर एका भरधाव महिंद्रा पिकअपला उडवल्याने भीषण अपघात झाला. यात सात महिलांचा जागीच मृत्यू तर पाच ते सहा जण जखमी झालेत. ही घटना बुधवारी सायंकाळी जामनेर-कडवंची शिवारात घडला. माहिती मिळताच महामार्ग पोलिस व स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठून बचावकार्य सुरू केले. मृतकांच्या कुंटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर गवत काढण्याचे काम सुरू होते. त्यासाठी या महिला मजूर आल्या होत्या. जामवाडी शिवारात महामार्गाच्या सफाईचे काम आटोपून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअपमध्ये बसत होत्या. त्याचवेळी नागपूरमार्गे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने पिकअपला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात सात महिलांचा जागीच मृत्यू झाला तर पाच ते सहा जण जखमी झाले.

जखमींना तातडीने जालन्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी तीन महिलांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

कामगारांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह

या अपघातात कडूबाई रामदास मदन, ताराबाई गहीनाजी चौधरी, लक्ष्मीबाई संतोष मदन, अल्का दादाराव आदमाने, मीना परमेश्वर आदमाने व कांचन प्रकाश आदमाने या महिला मजुरांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. महिनाभराच्या आत हा दुसरा मोठा अपघात आहे. यापूर्वी करमाडजवळ रस्ता दुरुस्तीचे काम करुन जेवण करत असताना तीन कामगारांना ट्रकने चिरडले होते. समुद्धी महामार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघातामुळे कामगारांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ओव्हरस्पीड आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी असलेल्या नियमावलींची अंमलबजावणी होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---