ऑईल इंडियाने वाढवले कच्च्या तेलाचे उत्पादन, थारच्या वाळवंटातून दररोज १२०२ बॅरल्स

---Advertisement---

 

जयपूर : वाढता भू-राजकीय तणाव आणि जागतिक तेल बाजारातील अनिश्चिततेच्या पृष्ठभूमीवर ऑईल इंडिया लिमिटेडने राजस्थानमधील थारच्या वाळवंटातून होणारे कच्च्या तेलाचे उत्पादन लक्षणीयरीत्या वाढवले असून, जोधपूर सँडस्टोन फॉर्मेशनमधून दररोज १,२०० बॅरल्स इतक्या विक्रमी उत्पादनाची नोंद केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या सरकारी मालकीच्या कंपनीने मागील वर्षीच्या दररोज ७०५ बॅरल्सच्या तुलनेत आपले उत्पादन सुमारे ७० टक्क्यांनी वाढवले आहे. देशांतर्गत उत्पादन वाढवण्याच्या आणि ऊर्जा सुरक्षा बळकट करण्याच्या प्रयत्नांमधील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.

जैसलमेरमधील बाघेवाला क्षेत्रात उत्पादित होणारे कच्चे तेल टँकर्सद्वारे गुजरातच्या मेहसाणा येथील तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या (ओएनजीसी) केंद्रापर्यंत वाहून नेले जाते आणि तिथून ते पाईपलाईनद्वारे इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे (आयओसीएल) चालवल्या जाणाऱ्या ‘कोयाली’ शुद्धीकरण प्रकल्पाकडे पाठवले जाते.

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ऑईल इंडियाच्या राजस्थान क्षेत्रातील कच्च्या तेलाचे वार्षिक उत्पादन ४३,७७३ मेट्रिक टनांवर पोहोचले. हे प्रमाण मागील वर्षातील ३२,७८८ मेट्रिक टनांच्या तुलनेत वाढले असून, तांत्रिक प्रगती आणि कार्यक्षम कामकाजामुळे साध्य झालेली ही भक्कम वाढ दर्शवते.

हे यश आधुनिक पुनप्राप्ती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मिळाले आहे. यात चक्रीय बाष्प उत्तेजना (सायक्लिक स्टीम स्टिम्युलेशन) या उच्च स्निग्धता असलेल्या कच्च्या तेलाच्या निष्कर्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या औष्णिक वर्धित तेल पुनप्राप्ती पद्धतीचा समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेषतः थार प्रदेशातील आव्हानात्मक भूशास्त्रीय परिस्थितीचा विचार करता, ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. भारताच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यात अपारंपरिक संसाधनांमध्ये असलेली क्षमता यातून अधोरेखित होते, असे एका अधिकाऱ्याने म्हटले.

राजस्थान खोऱ्यातील बिकानेर-नागौर उपखोऱ्यातील बाघेवाला तेलक्षेत्र हे देशातील मोजक्याच भूभागावरील जड तेलक्षेत्रांपैकी एक आहे. ऑईल इंडियाने १९ विहिरींमध्ये सीएसएस ऑपरेशन्स पूर्ण केले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत हे जवळपास ७२ टक्क्यांनी जास्त आहेत आणि या वर्षात १३ नवीन विहिरींचे उत्खनन केले आहे. यांची संख्या मागील वर्षाच्या नऊ विहिरींच्या तुलनेत वाढली आहे.

कच्च्या तेलाची उच्च स्निग्धता

उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी कंपने फिशनोब ड्रिलिंग आणि बेअरफूट कम्प्लिशन यासारख्या प्रगत ड्रिलिंग आणि उत्पादन तंत्रज्ञानाचाही वापर केला आहे. हे तंत्रज्ञान भारतातील जड तेलाच्या साठ्यांमध्ये प्रथमच वापरले जात आहे. यासोबतच इलेक्ट्रिक डाऊनहोल हीटर्स, हायड्रॉलिक सकर रॉड पंप आणि उच्च तापमानाती थर्मल वेलहेड्सचाही वापर केला जात आहे. या क्षेत्रातील कच्च्या तेलाच्या उच्च स्निग्धतेमुळे पारंपरिक पद्धतीने ते काढणे व्यवहार्य नव्हते. त्यामुळे डायल्युएंट इंजेक्शन आणि आर्टिफिशियल लिफ्ट सिस्टिम यासारख्या नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करण्यास प्रवृत्त व्हावे लागेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---