बाळद तलाठी अतुल देवरे यांची चौकशी होऊन बदलीची मागणी;पाचोरा तहसीलदार,पोलीस निरीक्षक,प्रांताधिकारी यांना निवेदन

---Advertisement---

 

पाचोरा (प्रतिनिधी) : बाळद येथे कार्यरत तलाठी अतुल देवरे यांच्या विरोधात वाढत्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांची चौकशी होऊन बदलीची मागणी करण्यात आली असून यासंदर्भात शिवसेना नगरसेवक संदीप पाटील यांनी पाचोरा तहसीलदारसह पोलिस निरीक्षक,प्रांताधिकारी कार्यालय यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, अतुल देवरे हे पाचोरा तालुक्यातील बाळद येथे तलाठी या पदावर कार्यरत असून, त्यांनी पाचोरा शहरात सर्रास पैसे वसुलीचा धुमाकूळ माजवला आहे. त्यांच्या विषयी शहरात बऱ्याच तक्रारी समोर आल्या आहेत ते दारू पिऊन रात्रीस मुलांना मारहाण करणे एखादे वाहन वाळू सह तहसील कार्यालयात जमा केल्या नंतर तहसिलदार यांना माहीत नसतांना पंचनामा व योग्यती कारवाही न करता संबधित मालकाडून ५० हजार ते १ लाख रुपये घेऊन रात्रीस गेट खुले करून वाहन पळविण्यात त्यांचा सहभाग असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

त्यांनी अनेक अशी कामे केली आहे त्यामुळे पाचोरा महसूल विभाग अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांचे किती वाळू वाहन चालकांसोबत संबंध आहेत व ते किती लोकांकडून पैसे वसूली करतात व अनेक विषय निष्पन्न करणे करीता त्यांचा जवळील दोघही मोबाईलचे CDR मागवून ते ते चेक करावे आणि ते जे व्हॉटअप्स वापरतात त्या कंपनी कडून त्या व्हॉटअप्स मेसेजेस व कॉल हिस्ट्री मागवावी त्यात त्यांचे सर्व काळे धंधे समोर येतील आणि त्या एका तलाठ्यामुळे अनेक तलाठ्यानां विनाकारणाचा वादास सामोरे जावे लागते, कारण तलाठी अतुल देवरे हे हप्ता वसूली करत असल्यास वाहन इतर तलाठ्यानी रेती सह पकडल्यास तेव्हा तो वाहन चालक सांगतो की मी तलाठी अतुल देवरे यांना हप्ता देतो तुह्मी माझे वाहन का थांबवले माझे वाहन सोडा वाहन चालकाचे व संबंधीत तलाठ्याचे वादात रूपांतर होते.

तसेच तलाठी अतुल देवरे हे अरेरावी ची भाषा वापरुन, माझी बदली कोणच्या बापाने पण होणार नाही असे नेहमी चारचौघात बोलत असतात. माझे काय वाकडे करायचे ते करा असे नेहमी बोलत असतात. असा ही उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. सदरील तलाठी विरोधात पाचोरा पोलिस स्टेशन येथे तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

या सर्व गोष्टींना तलाठी अतुल देवरे हे कारणीभूत आहे. त्यामुळे अनेक तलाठ्यानां काम करण्यास अडचण निर्माण होत आहे. अतुल देवरे यांच्या काळ्या धंदे विषयी सर्वत्र चर्चा असून त्या संबधिचे व्हिडीओ ही माझ्याकडे पुरावे स्वरूपात असल्याचे तक्रारदार यांनी म्हटले आहे. पाचोरा शहराचे शांततेचे वातावरण लक्षात घेता एका व्यक्तिमुळे पाचोरा महसूल विभागाची होणारी बदनामी व येणाऱ्या अडचणी लक्षात घेता तलाठी देवरे यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून त्यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी करण्यात आली आहे. सदरील मस्तवाल तलाठ्यास महसूल विभागाने जर पाठीशी घालून इतरत्र बदली केली नाही तर, महसूल विभागाच्या मनमानी कारभारा विषयी आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे, प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसिलदार यांना निवेदन सादर करतांना शिवसेना नगरसेवक संदीप पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारावकर आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---